शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नातवानेच मारला आजीच्या दागिन्यावर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:53 IST

कणकवली तालुक्यातील घोणसरी पिंपळवाडी येथे नातवाने आजीच्या दागिन्यावर डल्ला मारण्याचा प्रकार घडला आहे. ६७ हजार रुपये किमतीची सव्वा दोन तोळ्यांची सोन्याची माळ नातवाने लंपास केली असून आजीच्या तक्रारीवरून पोलिसांनी नातवावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देनातवानेच मारला आजीच्या दागिन्यावर डल्लाघोणसरी येथील घटना : सोन्याची माळ लंपास

कणकवली : तालुक्यातील घोणसरी पिंपळवाडी येथे नातवाने आजीच्या दागिन्यावर डल्ला मारण्याचा प्रकार घडला आहे. ६७ हजार रुपये किमतीची सव्वा दोन तोळ्यांची सोन्याची माळ नातवाने लंपास केली असून आजीच्या तक्रारीवरून पोलिसांनी नातवावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.घोणसरी पिंपळवाडी येथे शारदा मारुती साळसकर (६५) ही वृद्ध महिला राहते. ५ जुलै रोजी तिचा नातू अतिश राजेंद्र साळसकर (२२, सध्या राहणार चिपळूण, परशी तिठा) हा घोणसरी येथे आला. तसेच शारदा हिच्याकडे तिचे रेशनिंग कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक आदी कागदपत्रांची मागणी तो करू लागला. त्या रागाने त्याने शारदा हिला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली.

घरातील लाकडीपेटीमधील कागदपत्रे तसेच सव्वा दोन तोळ्यांची सोन्याची माळ घेऊन तो पसार झाला. त्याच्याकडे मागणी करूनही त्याने सोन्याची माळ व कागदपत्रे दिली नाहीत. त्यामुळे शेवटी शारदा हिने पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अतिश याच्यावर गुन्हा नोंद केला असून या घटनेचा तपास फोंडाघाट पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार दयानंद चव्हाण करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग