शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

gram panchayat election: ..अन् सिंधुदुर्गातील चराठा येथील विहीर चक्क बोलू लागली, गावात चर्चेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 13:05 IST

अनंत जाधव  सावंतवाडी : सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणूक प्रचार ही गावागावांत शिगेला पोचला आहे. अशातच ...

अनंत जाधव सावंतवाडी : सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणूक प्रचार ही गावागावांत शिगेला पोचला आहे. अशातच निवडणुकीचे वेगवेगळे फंडे आता समोर येऊ लागले आहेत. सावंतवाडी तालुक्यातील चराठा गावात तर निवडणुकीच्या निमित्ताने एक विहीर बोलू लागली आहे.वीस वर्षापूर्वी तुमची तहान भागवण्यासाठी माझा जन्म झाला, पण मी बिनकामाची आहे. माझी चूक तरी काय? मग मला व्दोष का देता असे सांगत ही विहीर आता पत्रकाच्या माध्यमातून निवडणूक प्रचारात उतरली आहे. हे निवडणूक पत्रक अनेकांचे मात्र मनोरंजन होत आहे.गावागावांत ग्रामपंचायत निवडणुकीची धूम सुरू आहे. अनेक जण आपल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवत आहे. कुठल्याही पक्षाचे चिन्ह नसल्याने गाव पातळीवर आपले मुद्दे घेऊन प्रत्येकाला या निवडणुकीत सामोरे जावे लागत आहे. अशातच अनेक जण आपल्या पद्धतीने नवनवीन मुद्दे पुढे करताना दिसत आहेत. सावंतवाडी तालुक्यातील चाराठा गावात तर असाच एक निवडणूक फंडा सध्या चर्चेला आला आहे.चराठा येथील तिलारी कॉलनीच्या मागे असलेली विहीर पत्रकाच्या माध्यमातून बोलू लागली आहे. मी विहीर बोलते माझं गाव चराटा तिलारी कॉलनीच्या मागे आहे. माझा जन्म वीस वर्षांपूर्वी झाला. मी अशीच वीस वर्षे बिनकामी पडून आहे. ज्या जनतेची तहान भागवण्यासाठी माझा जन्म झाला, त्याचा उपयोग न करता मी अशीच पडून आहे. माझा वापर का करत नाही की माझ्याकडून काही चूक झाली? म्हणून माझा तुम्ही द्वेष करत आहात? आता तर पंप बसवण्याची निविदा तीन महिन्यापूर्वीच झाली तरी सुद्धा तुम्ही पंप बसवण्याचे काम करत नाहीत. आता तरी त्या तहानलेल्या जनतेसाठी माझा तुम्ही उपयोग करून घ्या जेणेकरून माझा जन्म सार्थकी लागेल, असे म्हटले या पत्रकात म्हटले आहे.चराट्या गावात गेली अनेक वर्ष पाणी प्रश्न आवासून उभा आहे. अशातच या गावाला नगरपालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र तेथील खोदण्यात आलेल्या विहिरी पाणी असतानाही तशाच पडून असल्याने ग्रामस्थांना या विहिरीचे पाणी का दिले जात नाही. स्वतःच्या गावात विहीर असताना दुसऱ्यावर अवलंबून का ठेवण्यात येते असे अनेक प्रश्न या माध्यमातून उभे राहिले आहेत. पत्रकातून विहिर बोलत असली तरी त्याची चर्चा मात्र संपूर्ण गावात सुरू झाली आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक