शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: उन्हाळ्यातील ‘वृक्षारोपण’; रोजगार निर्मितीच्या ‘माईलस्टोन’ ची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 18:25 IST

प्रकाश काळे वैभववाडी : वैभववाडी उंबर्डे आणि खारेपाटण गगनबावडा मार्गांच्या दुतर्फा अलिकडेच जेसीबीने खड्डे मारण्यात आले. ते कशासाठी हे ...

प्रकाश काळेवैभववाडी : वैभववाडी उंबर्डे आणि खारेपाटण गगनबावडा मार्गांच्या दुतर्फा अलिकडेच जेसीबीने खड्डे मारण्यात आले. ते कशासाठी हे मात्र समजले नव्हते. गेल्याच आठवड्यात त्यामध्ये ‘उन्हाळी वृक्षारोपण’ केले गेले. तेव्हा कळले आपलं सरकार ‘पर्यावरणाचा समतोल’ राखण्यासाठी खरंच काहीतरी करू पाहतंय.पण गंमत अशी की, उष्णतेने कहर गाठला असताना केलेले ‘सरकारी वृक्षारोपण’ आठवडाभरातच करपून गेले. त्याहून मजेशीर गोष्ट म्हणजे त्या वृक्षारोपणाला प्लास्टिकच्या जाळ्यांनी संरक्षण केलंय. जे कोणीतरी सहज काढून नेईल. नाहीच नेले तर पुढच्या उन्हाळ्यातील ‘वणव्यात’ हमखास जळून जाईल.हा उन्हाळी वृक्षारोपणाचा सरकारी कार्यक्रम बहुधा दरवर्षीच होत असतो. त्यातून मजूर, रोपवाटिका व्यावसायिक, प्लास्टिक जाळ्या विक्रेते, पाण्याचे टँकर, ट्रॅक्टर मालक अशा घटकांना रोजगार देऊन त्यांना जगविण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये शासकीय यंत्रणेतील कोणावरही संशय घेण्यास कुठेही वाव दिसत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात लावलेलं रोपटं जगलंच पाहिजे, अशी शासन निर्णयात कुठेही अट नसावी.अन्यथा विशिष्ट भागात दरवर्षी होणाऱ्या या सरकारी सोहळ्यातून रस्त्याच्या दुतर्फा गच्च हिरवी वनराई आणि वाटसरूंना शीतल सावली मिळायला काय हरकत होती? असो. नाहीतरी वाढत्या महागाईत पगार पुरतोय कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गroad transportरस्ते वाहतूक