शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने काजू आयात शुल्क १० टक्के करावे, काजू, आंबा बागायतदारांच्या बैठकीत ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 17:40 IST

काजू प्रक्रिया उद्योगाला शंभर वर्षे झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आयात काजू बीवरील आयात शुल्क ५ टक्क्यावरुन अडीच टक्के केल्याने परदेशातील काजू बीची आयात वाढली आहे. त्यामुळे येथील काजू बीचे दर घसरले आहेत. शासनाने काजू आयात शुल्क १० टक्के करावे, असा ठराव सिंधुदुर्ग काजू आंबा बागायतदार, शास्त्रज्ञ विचार मंचच्या सभेत करण्यात आला.

ठळक मुद्देशासनाने काजू आयात शुल्क १० टक्के करावेकाजू, आंबा बागायतदारांच्या बैठकीत ठराव

वेंगुर्ले : काजू प्रक्रिया उद्योगाला शंभर वर्षे झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आयात काजू बीवरील आयात शुल्क ५ टक्क्यावरुन अडीच टक्के केल्याने परदेशातील काजू बीची आयात वाढली आहे. त्यामुळे येथील काजू बीचे दर घसरले आहेत. शासनाने काजू आयात शुल्क १० टक्के करावे, असा ठराव सिंधुदुर्ग काजू आंबा बागायतदार, शास्त्रज्ञ विचार मंचच्या सभेत करण्यात आला.सिंधुदुर्ग काजू, आंबा बागायतदार शास्त्रज्ञ विचार मंचची सभा येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र्राच्या सभागृहात मंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी शिवराम आरोलकर, दाजी धुरी, प्रकाश गावडे, सदाशिव आळवे, विलास ठाकूर, हनुमंत आंगचेकर, समाधान बांदवलकर, रामचंद्र मांजरेकर, प्रताप गावस्कर, प्रकाश बोवलेकर, संतोष लुडबे, श्रीकांत नाईक, निखील धरणे आदी उपस्थित होते.काजू धोरण निश्चित करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली काजू फळबाग विकास समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा होत्या. मात्र, या समितीमध्ये काजू बागायतदार शेतकऱ्यांपेक्षा कारखानदारांचाच जास्त भरणा असल्याने त्यांनी काजू कारखानदारीसाठी अनुकूल धोरण आखले.

त्यात शेतकऱ्यांचा फायदा न होता त्याचा कारखानदारांना फायदा झाला. त्यामुळे ही समिती शासनाने रद्द करुन समितीमध्ये काजू बागायतदारांचे प्रत्येक जिल्ह्यातून एक याप्रमाणे प्रतिनिधी नेमावा, असा ठराव करण्यात आला. डॉ. बी. एन. सावंत, डॉ. मोहन दळवी, डॉ. संजय देसाई यांनी मार्गदर्शन केले.११ फेब्रुवारीला वेंगुर्लेत मेळावाकाजू मानांकनासंदर्भात चर्चा करण्यासाठी ११ फेब्रुवारीला वेंगुर्ले फळ संशोधन केंद्र्रात मेळावा आयोजित केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी वेंगुर्ले भेटीत येथील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कृषिमंत्र्यांसमवेत शेतकऱ्यांची बैठक घेण्याची ग्वाही दिली होती. त्याप्रमाणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कृषिमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग