मंडणगड महाविद्यालयाला गोपीनाथ मुंडेंचे नाव
By Admin | Updated: June 5, 2015 00:21 IST2015-06-04T23:17:49+5:302015-06-05T00:21:42+5:30
नामफलकाचे अनावरण : स्मृतिदिनी मुंडेंना आगळीवेगळी श्रध्दांजली

मंडणगड महाविद्यालयाला गोपीनाथ मुंडेंचे नाव
मंडणगड : मंडणगड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थाध्यक्ष कर्मवीर दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांचा प्रथम स्मृतिदिन साजरा करण्यात आला़. यावेळी मंडणगड येथील महाविद्यालयाला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या नामबदलाच्या नामफलकाचे अनावरण कर्मवीर दादा इदाते यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे कार्यवाह प्रा. सतीश शेठ, उपाध्यक्ष श्रीराम इदाते, उपाध्यक्ष आप्पासाहेब आयरे, माजी प्राचार्य आदिनाथ सांगले, संचालिका अपर्णा करमरकर, संचालक विवेक इदाते, संचालिका संपदा पारकर, संचालक विश्वदास लोखंडे, स्थानिक संचालक आदेश मर्चंडे, डॉ. सुरेश लेंडे, अभय सोमण, प्रभारी प्राचार्य दगडू जगताप, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, सदाशिव रसाळ, कुंबळे हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील घाणेकर, राजीव चव्हाण, इक्बाल मनियार, हनुमंत भारदे, प्रभाकर भारदे, कादवण आश्रमशाळेचे मुख्याध्यापक दरेकर उपस्थित होते़ मुंडे यांचा स्मृतिदिन ३ ते ९ जून या कालावधीत ‘पर्यावरण सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यानिमित्ताने महाविद्यालय परिसरात कर्मवीर दादा इदाते व उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आंबा, काजू, कोकम, फणस, साग, पेरू अशी विविध झाडे लावण्यात आली. यावेळी संपदा पारकर, विवेक इदाते, माजी प्राचार्य आदिनाथ सांगले आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. विष्णू जायभाये यांनी केले. उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)