शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, खरेदीची रक्कम अन् बोनस  मिळणार 

By सुधीर राणे | Updated: March 31, 2023 16:58 IST

५ हजार ६२१ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांकडून शासनाने १ लाख ६२२ क्विंटल भात खरेदी केली होती. भात खरेदीची रक्कम आणि बोनस  संबधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. ही रक्कम २६ कोटी २५ लाख ६९ हजार रुपये असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली. कणकवली येथील शासकीय विश्रामगृह आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यासाठी भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. तसेच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पाठपुरावा केला असल्याचेही ते म्हणाले.यावेळी काळसेकर म्हणाले, गेल्या काही वर्षंपासून शेतकऱ्यांकडून  भात खरेदी केली जाते. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या भात शेतीची  ई- पीक पाहणी करत भात खरेदी केंद्रांवर नोंद केली आहे. त्या शेतकऱ्यांना बोनस स्वरुपात ५ कोटी ७३ लाख २० हजार ६१० रुपये आणि भात विक्रीचे २० कोटी ५२ लाख ६९ हजार ३९० रुपये असे एकूण २६ कोटी २५ लाख ६९ हजार रुपये प्राप्त होणार आहेत. ५ हजार ६२१ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. याबाबत शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास जिल्हा बँक अध्यक्ष अथवा आपल्याला संपर्क साधावा. यापूर्वीच्या  काळात भात खरेदी दर अत्यल्प होता. व्यापारी कवडीमोल दराने भात खरेदी करीत होते. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने १७ रुपये दराने भात खरेदी करत बोनस देतो असे सांगितले होते. मात्र,त्यांना तो देता आलेला नाही. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा करूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले नाहीत असा टोलाही अतुल काळसेकर यांनी यावेळी लगावला.भात उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपये बोनस स्वरूपात मिळणार आहेत. तर सध्याच्या शिंदे-फडणवीस युती सरकारने निधीची विशेष तरतूद अर्थसंकल्पात केल्याने काजू बागायतदारांना दिलासा मिळणार आहे. जीआय मानांकन करण्यासाठीही  तरतूद करण्यात आली आहे. येत्या  काळात काजू बोंडू पासून इथेलॉन निर्मिती करणारा प्रकल्प सुरू करण्यात येईल. काजूला हमीभाव मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही अतुल काळसेकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गbankबँकFarmerशेतकरी