शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याची एलईडी नौका मालवण समुद्रात पकडली; सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:07 IST

नौकेवरील माशांचा लिलाव

मालवण : महाराष्ट्र जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर ११ सागरी मैल येथे अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या गोवा येथील नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य खात्याचा पदभार घेतल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत अनधिकृत एलईडी लाईट नौकांवर  कारवाईचा धडाकाच लावला आहे. मोठ्या प्रमाणात कारवाई मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात मत्स्य विभागाने केली आहे.  रविवारी (दि.३०) रात्री सिंधुदुर्ग मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी रवींद्र मालवणकर, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, दांडी मालवण हे समुद्रात नियमित गस्त घालत होते. यावेळी गोवा राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली नौका बलाका जेजू नों. क्र. आयएनडी जीए ५ एमएम २३५१ द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर ११ सागरी मैल येथे अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईटद्वारे मासेमारी करत असताना दिसून आली.ही नौका मत्स्य विभागाने ताब्यात घेतली आहे. या नौकेवर नौका तांडेलसह ३० खलाशी होते. नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. त्यावरील मासळीचा लिलाव करण्याची कार्यवाही सुरू होती. वागटी, सुरमई, बांगडा आदी प्रकारचे मासे नौकेवर आहेत. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करून सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, सिंधदुर्ग कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. या कारवाईमुळे एलइडी  मच्छीमारांमध्ये  खळबळ उडाली आहे.

न्यायालयात सुनावणीअंमलबजावणी अधिकारी रवींद्र मालवणकर, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, दांडी मालवण यांनी पोलिस कर्मचारी पाटोळे तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण यांचे सहकार्याने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे.अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर या नौकेबाबत सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, सिंधुदुर्ग यांचे न्यायालयात ठेवण्यात येणार असून पुढील कारवाई होणार आहेत.

सामग्री जप्तअंदाजे ६ ते ७ लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत ही कारवाई करण्यात येत असून या नौकेस मोठा दंड होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgoaगोवाfishermanमच्छीमार