शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी भाषेवरुन वाद निर्माण करु नये, अन्यथा..; मनसे नेते परशुराम उपरकरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 15:41 IST

कोकणी भाषेच्या प्रसारासाठी लहान बालकांना त्या भाषेतील साहित्य देण्याचा निर्णय गोव्यात झाला आहे. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही करण्याचे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले हे चुकीचे.

कणकवली : गोव्यात मराठी व कोकणी भाषा यावरून सध्या वाद सुरू आहे. त्यातच  गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोकणीच्या वादाची ठिणगी सिंधुदुर्ग जिल्ह्यात टाकण्याची गरज नव्हती. मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी कोकणी, मराठी व मालवणी भाषेत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा मनसेला तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे.मालवण येथील कोकणी भाषा परिषदेला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हजेरी लावली. जरी कोकणी ही एक भाषा असली तरी आमची बोली भाषा ही मालवणी असल्याचे ते म्हणाले. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आज, सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  परशुराम उपरकर पुढे म्हणाले, कोकणी भाषेच्या प्रसारासाठी लहान बालकांना त्या भाषेतील साहित्य देण्याचा निर्णय गोव्यात झाला आहे. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही करण्याचे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले हे चुकीचे आहे. त्या कोकणी भाषा परिषदेला सिंधुदुर्गातील स्थानिक आमदारांनी उपस्थित राहून पाठींबा देणे हेही चुकीचेच असल्याचा आरोप उपरकर यांनी यावेळी केला.मालवणी भाषेत भाषण करणारा एकमेव आमदारआमची मराठी भाषा असली तरी आमची मालवणी ही बोली भाषा आहे. आता  मालवणी माणूस कुठेही गेला तरी मालवणीच बोलू लागला आहे. मी आमदार असताना महाराष्ट्र विधानपरिषदेत अर्थसंकल्पाच्या वेळी मालवणी भाषेत भाषण करणारा एकमेव आमदार होतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.महाराष्ट्रात मराठी, कोकणी, मालवणी वाद निर्माण करु नयेगोव्याच्या  मुख्यमंत्र्यांना सिंधुदुर्गात कोकणी परिषदेच्या निमित्ताने आणून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी गोव्यापुरताच कोकणी भाषेचा प्रसार मर्यादित ठेवावा. महाराष्ट्र राज्यात मराठी, कोकणी, मालवणी असे वाद निर्माण करु नये. त्यांचा उद्देश लक्षात आल्यानेच या कोकणी भाषा परिषदेकडे तरुणांनी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील तरुणांनी कोकणी भाषेचा चुकीचा प्रसार करण्याऱ्या लोकांना रोखण्याचे काम केले पाहीजे.कोकण चित्रपट महोत्सवात का सहभागी झाले नाहीत?सिंधुदुर्गात आलेले गोव्याचे मुख्यमंत्री कोकण चित्रपट महोत्सवात का सहभागी झाले नाहीत? पक्षीय पातळीवरून गोव्याची कोकणी भाषा महाराष्ट्र राज्यात आणण्याची गरज नाही. तसे झाल्यास मराठी व मालवणी भाषेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही तीव्र आंदोलन करेल. असेही उपरकर म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgoaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतMNSमनसे