शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून दोडामार्गात जमीन व्यवहार, धुरी यांचा गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 15:04 IST

तळेखोल येथे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खरेदी केलेला ७ एकर जमिनीचा व्यवहार हा त्याचीच एक झलक आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांनी केला.

ठळक मुद्दे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून दोडामार्गात जमीन व्यवहार, धुरी यांचा गौप्यस्फोटविनाशकारी प्रकल्पासाठी दोडामार्ग विलिनीकरणाचा त्यांचा डाव

दोडामार्ग : गोव्यातील धनदांडग्या लोकांना जमिनी विकत घेता याव्यात आणि मायनिंग तसेच इतर विनाशकारी प्रकल्प सुरु करता यावेत यासाठी काही लोकांना हाताशी धरून दोडामार्ग तालुका गोव्यात विलिनीकरणाचा डाव आखला जात आहे, असा गौप्यस्फोट करीत तळेखोल येथे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खरेदी केलेला ७ एकर जमिनीचा व्यवहार हा त्याचीच एक झलक आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांनी केला.दोडामार्ग येथील सेनेच्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत वझरे सरपंच लक्ष्मण गवस, गोपाळ गवस, युवासेना उपतालुकाध्यक्ष भगवान गवस, कानू दळवी उपस्थित होते.धुरी म्हणाले, गोव्यातील धनदांडग्या लोकांचा दोडामार्ग तालुक्यातील जमिनीवर डोळा आहे. त्यांना या जमिनी विकत घेऊन या ठिकाणी मायनिंग आणायचे आहे. शिवाय इतर विनाशकारी प्रकल्प आणून स्वत:चा स्वार्थ साधायचा आहे.त्यासाठी तालुक्यातील काही लोकांना त्यांनी हाताशी धरून तरुणांची माथी भडकविण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, त्यांचा हा प्रयत्न शिवसेना हाणून पाडेल, असे सांगत त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले.गवस म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत गोव्याचे मंत्रिमंडळ अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात का उतरले होते हे आता ध्यानात येत असून, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तळेखोल येथे १५ दिवसांपूर्वी ७ एकर जमिनीचा खरेदी व्यवहार केलेला आहे.

ज्यात काळा दगड व क्रशर आहे. विनाशकारी प्रकल्प तालुक्यात आणण्याचा हा एक ट्रेलर  आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच खरेदी व्यवहाराची प्रतही त्यांनी पुरावा म्हणून पत्रकारांसमोर सादर केली.बंद लखोट्यात दडलेय काय?शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यावर टीकेची झोड उठविली. पण त्याचबरोबर एक बंद लखोटाही पत्रकारांना दाखविला. त्यात गोव्यातील धनदांडग्यांना जमीन विकणाऱ्यांची नावे असून एक सीडीही असल्याचे सांगितले.

दोडामार्ग विलिनीकरणाची चळवळ वेळीच थांबली नाही तर ही नावे व त्यातील सीडी उघड करू, असा इशाराही त्यांनी दिला. या लाखोट्यात नेमके दडलेय काय? आणि ती सीडी नेमकी कसली आहे? याबाबत तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :goaगोवाsindhudurgसिंधुदुर्ग