शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत लक्षवेधी मांडा; अर्चना पारे-परब यांनी दिले जयंत पाटील यांना निवेदन 

By अनंत खं.जाधव | Updated: July 5, 2024 17:31 IST

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू व भात उत्पादक शेतकऱ्यांच्या कर्ज माफी संदर्भात विधानसभेत लक्षवेधी मांडण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ...

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू व भात उत्पादक शेतकऱ्यांच्या कर्ज माफी संदर्भात विधानसभेत लक्षवेधी मांडण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांचे राष्ट्रवादीच्या कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे परब व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेने अधिवेशनात लक्ष वेधले आहे. कर्जमाफी संदर्भात लक्षवेधी मांडून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात मदत मिळावी अशी विनंती ही आमदार पाटील यांना केली.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्यावतीने घोषित केलेल्या कर्जमाफी बाबतची अ‌द्याप पूर्तता करण्यात आली नसून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत उर्वरित शेतक-यांना लाभ मिळणे, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाखांवरील शेतक-यांना कर्जमाफी, खावटी कर्जमाफी व खावटी कर्जमाफीची मुदत वाढविणे यासह नियमित कर्ज परतफेड करणा-या शेतक-यांना प्रोत्साहनपर अनुदान ५० हजार देण्याबाबत तरतूद आहे. कोकणातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीने देखील अनेक वेळा अडचणीत आलेला असून वरील बाबींवर सरकार कोणताच निर्णय घेत नाही.यावर तत्कालीन सहकार मंत्री अतुल सावे यांनी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल सरकारकडून आदेश काढण्यात आला असून ती रक्कम अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा झाली नाही. २ लाखावरील थकबाकी असणारे शेतकरी मध्यभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कोणताही निर्णय झाला नसून यामध्ये अनेक शेतकरी कर्जमाफी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व गोष्टी गांभीर्यतेने विचार करून मार्गी लावाव्यात अशी सिंधुदुर्गमधील शेतकऱ्यांची मागणी आहे.जिल्ह्यातील आंबा, काजू व भात उत्पादक शेतकऱ्यांच्या कर्ज माफी संदर्भात विधानसभेत लक्षवेधी मांडून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात मदत व्हावी अशी विनंती आमदार जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामसुंदर राय, सचिव महेश चव्हाण, राष्ट्रवादीचे तुळस विभाग अध्यक्ष अवधूत मराठे, संदीप घारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गJayant Patilजयंत पाटीलFarmerशेतकरी