ग्रामीण भागातील तरूणींनाही ‘जीन पॅँट’ सवयीची !

By Admin | Updated: August 11, 2014 22:00 IST2014-08-11T21:33:52+5:302014-08-11T22:00:35+5:30

पुरोगामी सातारा: महाविद्यालयांमध्ये मुलींना जीन्सचा ड्रेसकोड

'Genre Pant' habits in rural areas | ग्रामीण भागातील तरूणींनाही ‘जीन पॅँट’ सवयीची !

ग्रामीण भागातील तरूणींनाही ‘जीन पॅँट’ सवयीची !

सातारा : पुरोगामी महाराष्ट्रातील सातारा जिल्हा क्रांतिकारक म्हणून ओळखला जातो. क्रांतिकारकाची ही भूमिका या जिल्ह्याने कायम राखली आहे. एकीकडे मुलींना जीन्स घालण्यावर बंदी घालणारं राज्य भारतात आहे, तर साताऱ्यासारख्या निवृत्तांच्या शहरात या जीन्सला चक्क महाविद्यालयीन गणवेशाचा भाग बनवला गेलं आहे. लिंगभेदाच्या पल्याड विचार करण्याच्या प्रगल्भतेचे हे लक्षण म्हणावे लागेल. उत्तरप्रदेश सरकारने नुकतेच मुलींच्या जीन्स घालण्यावर बंदी आणली आहे. स्वतंत्र भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यात वावरणाऱ्या तमाम भारतीयांना या आदेशाने निश्चितच आश्चर्य वाटले. याच्या अगदी उलट परिस्थिती साताऱ्यात पाहायला मिळते.
मुलींना वावरायला सुटसुटीत व्हावे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास यावा, या हेतूने महाविद्यालयांनी काही वर्षांपूर्वी जीन्सचा समावेश असणारा गणवेश निश्चित केला.
शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातून शिक्षणासाठी मुली मोठ्या प्रमाणावर येतात. शहरी भागातील मुली फॅशन म्हणून जीन्स
घालतात.तर ग्रामीण भागातील मुली सलवार कुर्ता घालून येत होत्या. या दोन संस्कृतींतील दरी दूर करून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना एकाच पातळीवर राहून ते घ्यावे, या उद्देशाने हा गणवेश ठरविण्यात आला. लाँग कुर्ता आणि जीन्स हा शहरातील बहुतांश महाविद्यालयांनी मुलींसाठी केलेला गणवेश आहे. या गणवेशाचे ग्रामीण आणि शहरी भागातील मुलींनी जल्लोषी स्वागतही केले होते. (प्रतिनिधी)

ग्रामीण भाग अजूनही शहरीभागापेक्षा मागासलेला आहे. कोणतीही गोष्ट ग्रामीण भागात रुजण्यासाठी बराच कालावधी लागतो. आजही कपड्यांपासून राहणीमानापर्यंत या भागात बारकावे बघितले जातात. यामुळे इच्छा असून देखील जीन्स पॅन्ट घालणे शक्य नसते; परंतु सध्या अनेक महाविद्यालयांत पॅन्टचा गणवेश नावारूपाला आला. यामुळे लहानपणाची इच्छा महाविद्यालयात आल्याने पूर्ण झाली आहे. जीन्समुळे माझे व्यक्तिमत्त्व वाढल्याचे जाणवते.

सलवार बरोबर कुर्ताही मॅचिंग झाला पाहिजे, तरच तो ड्रेस शोभून दिसतो; परंतु आज-काल जीन्समुळे युवतींची ही कटकट संपली आहे. अगदी कोणताही कुर्ता, शर्ट, वा टी-शर्ट असो, त्याला एखादी जीन्स मॅच होते. यामुळे दररोज वेगवेगळी ड्रेसेच घालण्याचा आंनद मिळतो. तसेच दिसायलाही जीन्स अ‍ॅक्टिव्ह दिसतात. यामुळे आजच्या युगात सलवारीपेक्षा जीन्स भारी वाटायला लागली आहे.
- पूजा शिर्के

४महाविद्यालयात वावरताना सलवार कुर्तापेक्षा जीन्समध्ये वावरणं सोपं जातं, असं तरुणींचे मत आहे. जीन्सच्या खिशात किंवा कुर्ताच्या खिशात मोबाईल, पेन, पैसे व्यवस्थित ठेवता येतात. त्यामुळे प्रवासाच्यावेळी किंवा महाविद्यालयात वावरताना त्यांना सर्व आघाड्यांवर त्यांच्या हालचाली सोप्या होतात. ड्रेस घातला तर ओढणी सावरण्यात मुलींचा बराचसा वेळ जातो. जीन्सवर स्टोल घेत असल्यामुळे आवरणं, सावरण राहत नाही, असे युवतींना वाटते.
आत्मविश्वास वाढतो
४महाविद्यालयात जाताना मुली गोंधळलेल्या असतात. नवे आणि बेलगाम असे महाविद्यालय विश्व त्यांच्यासमोर उभे असते. इथे ‘आपलं आपण’ ही भावना वाढीस लागते. फॅशनच्या आजच्या जगात वावरताना मोठ्या शहरांमध्ये दिसणाऱ्या मुली आणि त्यांचा पेहराव हा निमशहरी आणि ग्रामीण भागातील मुलींच्या आकर्षणाचा केंद्र असते. त्यामुळे त्यांच्यासारखा पेहराव घातला की आत्मविश्वास वाढल्याची जाणीव निर्माण होते. ग्रामीण भागात ज्या मुलींना जीन्स घालता येत नाही, त्यांच्यासाठी महाविद्यालयाचा हा गणवेश उत्तम पर्याय ठरत आहे.

Web Title: 'Genre Pant' habits in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.