जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा तहकूब
By Admin | Updated: December 31, 2014 00:54 IST2014-12-31T00:53:40+5:302014-12-31T00:54:06+5:30
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा तहकूब

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा तहकूब
नाशिक : जिल्हा परिषदेची आज होणारी सर्वसाधारण सभा माजी मुख्यमंत्री ए़ आऱ अंतुले व जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य शंकरनाना खैरे यांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आली़ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली रावसाहेब थोरात सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते़ जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य शंकरनाना खैरे यांच्या निधनामुळेसभा तहकूब करण्यात यावी, असा ठराव प्रवीण जाधव यांनी मांडला, तर भास्कर गावित यांनी त्यास अनुमोदन दिले़ अध्यक्षांनी एक तास सभा तहकूब करून नंतर कामकाज चालू करण्याची सूचना मांडली; परंतु सदस्यांनी खैरे हे विद्यामान सदस्य असल्याने सभा घेण्यास विरोध केला़