गंथोत्सव ठरतोय लक्षवेधी
By Admin | Updated: February 27, 2015 23:18 IST2015-02-27T22:44:48+5:302015-02-27T23:18:32+5:30
शासनाचे आयोजन : दुर्मीळ गं्रथ, पुस्तकांमुळे वाचकांना पर्वणी

गंथोत्सव ठरतोय लक्षवेधी
कुडाळ : मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी आणि वाचन संस्कृती वाढावी, म्हणून शासनाच्यावतीने कुडाळ येथे सुरू केलेला ग्रंथोत्सव लक्षवेधी ठरत असून, या ग्रंथोत्सवात असलेल्या दुर्मीळ ग्रंथ व पुस्तकांमुळे वाचकांना पर्वणीच चालून आली आहे.
महाराष्ट्र शासनाने गं्रथचळवळ वाढावी, मराठी भाषा जतन व्हावी व त्याची अभिवृद्धी व्हावी, वाचन संस्कृती वाढावी, युवा पिढीला दुर्मीळ ग्रंथ सहज उपलब्ध व्हावेत, अशा अनेक उद्देशांनी सन २०१२ पासून शासनाच्यावतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सव घेण्याचे ठरले. हा ग्रंथोत्सव तेव्हापासून राज्य शासनाच्या मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा शासकीय ग्रंथालय यांच्यावतीने आयोजित केला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथोत्सव महोत्सवाची सुरुवात गुरुवार २६ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून, तो २८ फेब्रुवारीपर्यंत कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात सुरू राहणार आहेत. कुडाळ येथील या ग्रंथोत्सवात शासकीय मुद्रणालय व लेखन सामग्री कोल्हापूर, भाषा निकेतन पुणे, वैजयंती प्रकाशन सावंतवाडी, शासनाच्यावतीने लोक राज्य, जिल्हा माहिती कार्यालय होम रिवाईज अशा व इतर मिळून १० संस्थांनी सहभाग घेतला आहे. यावेळी बोलताना शासकीय मुद्रणालयाचे व लेखन सामग्रीचे कोल्हापूरचे अ. तु. पवार म्हणाले, तसेच गं्रथोत्सवातील पुस्तकांबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्यानेही या गं्रथोत्सवाची रंगत अधिकच वाढली आहे. (प्रतिनिधी)
पुस्तकांचे भांडार
या ग्रंथोत्सवामध्ये काही पुस्तके व गं्रथ असे आहेत की, ते दुर्मीळ किंवा सहज उपलब्ध न होणारे आहेत. याठिकाणी दुर्मीळ पुस्तके, ग्र्रंथांचे भांडारच उपलब्ध असल्याने जिल्ह्यातील वाचक वर्गासाठी ही एक पर्वणीच आहे. या प्रदर्शनात मुख्यत्वे करून सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक महाराष्ट्राची ओळख, छत्रपती संभाजी राजांच्या दुर्मीळ पत्रांचा अनुवाद के लेला ग्रंथ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणांचे तसेच विचारांचे खंड १ ते २२, भारताचे संविधान (इंग्रजी, मराठी एकत्र), आतापर्यंत विधानसभेत गाजलेल्या माजी आमदारांची भाषणे असलेला स्मृती ग्रंथ व नोंदीचा ग्रंथ, सिंधुदुर्ग पर्यटन कॉपीटेबल बुक अशाप्रकारचे विविध ग्रंथ तसेच पुस्तके या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.
या ग्रंथोत्सव दर्शनामुळे वाचकांना अनेक ग्रंथांचा, पुस्तकांचा लाभ मिळत असून साहित्य मंडळाच्या पुस्तकांचा लाभ मिळण्याची ही एक संधी चालून आली आहे. या ग्रंथोत्सवात दुर्मीळ गं्रथांबरोबरच लहान मुलांसाठी विज्ञान क्षेत्रातील तसेच कादंबरी, कथासंग्रह, आत्मचरित्र अशी विविध प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली आहेत, ती वाचकांसाठी पर्वणीच आहे.
- अ.तु. पवार, कोल्हापूर
वाचन संस्कृती वाढावी आणि मराठी भाषा जतन होऊन तिची अभिवृध्दी व्हावी, ग्रंथोत्सव प्रदर्शने छोटी साहित्य संमेलने म्हणून ओळखली जावीत, युवा पिढीला दुर्मीळ गं्रथांचे वाचन करण्यासाठी प्रवृत्त करणे, वाचन संस्कृती वाढविणे याकरिता या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, वाचकांना या ग्रंथोत्सवाचा बराच फायदा होणार आहे.
- संध्या गरवारे, माहिती अधिकारी