कुडाळ : येथील तालुक्यातील सर्व सेक्शन अंतर्गत वर्दळीच्या सार्वजनिक ठिकाणी असलेल्या विद्युत वाहिनींना गार्डिंग नसल्याने विद्युतवाहिन्या तुटून जीवितहानी होते. याबाबत सर्व्हे करून तातडीने गार्डिंग लाईन बसवावी, अशी मागणी पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्य दीपक नारकर यांनी केली. विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांनी महिन्याभरात तालुक्यातील सर्व विद्युत वाहिनींना गार्डिंग लाईन बसविणार असल्याचे सांगितले. कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा गुरुवारी सभापती शिल्पा घुर्ये, उपसभापती आर. के. सावंत, गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या धर्मवीर संभाजी राजे सभागृहात घेण्यात आली. वेताळबांबर्डे येथील अपघातग्रस्त म्हशीच्या मालकांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी आनंद भोगले यांनी केली. शहरातील सांडपाण्याबाबत पंचायत समिती स्तरावर चौकशी करण्याची मागणी शिल्पा घुर्ये व किशोर मर्गज यांनी केली. तसेच माणगाव तिठा ते पॉवर हाऊस रस्त्याची डागडुजी तातडीने व्हावी, अशी मागणी संतोष कुंभार यांनी केली. महामार्गावर पर्यटन स्थळाचे फलक लावावेत व लावलेले अंतर दर्शविणाऱ्या फलकांवर चुकीची माहिती असल्याचे दीपक नारकर यांनी सांगितले. कुडाळ ग्रामीण रुग्णालयातील रुग्णकल्याण समिती व कार्यकारी समिती नव्याने करण्याची मागणी दीपक नारकर यांनी केली. पुरस्कार पत्रकारांच्या अभिनंदनाचा ठराव् जिल्हास्तरीय पुरस्कारप्राप्त पत्रकारांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. यावेळी कनिष्ठ व महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विषयावर वक्तृत्व स्पर्धेतील गुणवंतांचा रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. ४कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम जागृती राणे (पणदूर), द्वितीय आतिशा फेराव (माणगाव), तृतीय सुलोचना प्रभू (कुडाळ), महाविद्यालयातून प्रथम- कल्पना ठोंबरे, द्वितीय- पूजा गाळवणकर (दोन्ही कुडाळ कॉलेज), तृतीय- चैतन्य दळवी (व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेज) यांनी यश प्राप्त केले.ा
वाहिन्यांना गार्डिंग टाका
By admin | Updated: January 25, 2015 00:50 IST