शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

Ganpati Festival- देवगडात खड्डेमय रस्त्यांतून गणेशभक्तांनी काढली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 18:05 IST

देवगड तालुक्यात सर्वत्र गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. तालुक्यात सोमवारी श्री गणेशाचे स्वागत उत्साहात करण्यात आले. यावर्षीही खड्डेमय रस्त्यातूनच बाप्पाला प्रवास करावा लागला.

ठळक मुद्दे देवगडात गणपती बाप्पाचा जयघोष, तालुक्यात गणरायांचे सनईच्या सुरात स्वागत खड्डेमय रस्त्यांतून गणेशभक्तांनी काढली वाट

देवगड : देवगड तालुक्यात सर्वत्र गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. तालुक्यात सोमवारी श्री गणेशाचे स्वागत उत्साहात करण्यात आले. यावर्षीही खड्डेमय रस्त्यातूनच बाप्पाला प्रवास करावा लागला.कोकणात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. देवगड तालुक्यातही या सणासाठी हजारोंच्या संख्येने चाकरमानी दाखल झाले आहेत. गणेशोत्सवाला सोमवारी सुरुवात झाली.

काही ठिकाणी गणेशमूर्ती रविवारी सायंकाळपासून तर काही ठिकाणी सोमवारी सकाळपासून वाजतगाजत व फटाक्यांच्या आतषबाजीत घरी नेण्यात आल्या. देवगड बाजारपेठही गणेशोत्सवाच्या निमित्ताने गजबजली आहे. देवगडमध्ये मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांमुळे दोन दिवस गर्दी होती.विविध आकारांची मखरे, विद्युत साहित्य, गणेश पूजेसाठी लागणारे साहित्य, फटाके, नैवेद्यासाठी लागणारे विविध पदार्थ, तोरणे आदींनी बाजारपेठ सजली होती. मात्र, गणेशोत्सवानिमित्त पहिल्या दिवशी दुपारनंतर बाजारपेठेत शुकशुकाट होता. गणेशोत्सव हा कोकणचा पारंपरिक उत्सव असल्याने व्यापाऱ्यांनीही गणेशाचे स्वागत करण्यासाठी आपली दुकाने बंद ठेवली होती.देवगड आगारात चाकरमान्यांना घेऊन आलेल्या गाड्यांचा ताफा दाखल झाला आहे. त्याचबरोबर या गाड्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठीही सज्ज आहेत. आगाराने चतुर्थी कालावधीत ठिकठिकाणी जादा गाड्याही सोडल्या आहेत.

पोलीस स्थानकातही श्रीगणेशाच्या मूर्तिची सोमवारी प्रतिष्ठापना करण्यात आली. तालुक्यात सर्वत्र गणेशाच्या आगमनाने गणेशभक्त आनंदीत झाले असून ठिकठिकाणी भजने, फुगड्या या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.देवगड-जामसंडे शहरात पावसाळी डांबराने खड्डे बुजविण्यात आले. मात्र, पावसाने सुरुवात केल्यामुळे व रस्त्यावर पाणी साचल्यामुळे जामसंडे पेट्रोलपंप आदी भागात खड्ड्यांची पुन्हा जैसे थे स्थिती झाली आहे. त्यामुळे खड्डेमय रस्त्यातूनच गणरायाचे आगमन झाले. खाडीकिनारपट्टीलगत असलेल्या गणेश मूर्तिशाळांमधील बाप्पाचा प्रवास हा कालवी, मोंड, कट्टा, मळई असा खाडीमधून होडीने व छोट्या यांत्रिक नौकेने झाला.गणेशोत्सव कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विजयदुर्ग पोलीस स्थानकामध्येही पोलिसांच्या दिमतीला होमगार्ड फौज आहे. विजयदुर्ग-तळेरे महामार्गाच्या केंद्रस्थानी असलेल्या पडेल तिठा येथे पोलीस तैनात आहेत. विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक संतोष कोळी सहकाऱ्यांसमवेत गस्त घालत आहेत.उत्साहाला उधाणगणेशोत्सवानिमित्त घरोघरी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून आगमनापासून ते विसर्जनापर्यंत गावोगावी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक गावांतील घरे या निमित्ताने उघडली गेल्याने गावातील वाड्या गणेशभक्तांनी गजबजल्या आहेत. गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवsindhudurgसिंधुदुर्ग