शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत जुगार अड्ड्यावर छापा, २० जण ताब्यात; सव्वा लाखांची रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 14:39 IST

कणकवली : कणकवलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या जुगार अड्ड्यावरील धाडीत १ लाख २४ ...

कणकवली : कणकवलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या जुगार अड्ड्यावरील धाडीत १ लाख २४ हजार रोख रुपये तर १२ दुचाकी, एक तीन आसनी रिक्षा, दोन कार असा मुद्देमाल जप्त केला आहे. तर २० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.तर काही गाड्यांचे मालक सापडले नसल्याने अजून संशयित आरोपी वाढण्याची शक्यता आहे.मंगळवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास कणकवली नागवे - करंजे हद्दीजवळील नदीच्या किनारी हा जुगार चालू होता. यामध्ये जयवंत आत्माराम बाईत ( ४७, रा . कणकवली, तेलीआळी) , रविंद्र तुकाराम बाणे (५२,रा . आशिये,बाणेवाडी ता . कणकवली),  सिध्देश अरविंद बांदेकर , (३८, रा .कणकवली, परबवाडी) , महादेव सूर्यकांत कुपेरकर (३३ , रा. आवळेगाव, कुंभारवाडी , ता . कुडाळ ), संदीप लक्ष्मण पाताडे ( ४६, रा. कणकवली,तेलीआळी) , राजु शिवराम जमादार (४०, रा .कणकवली,टेंबवाडी ),

चेतन सिताराम जामसंडेकर (२७, रा . सर्जेकोट , ता . मालवण ), प्रविण विठ्ठल आरोलकर (५४, रा . वागदे, सावरवाडी) , विलीन मंगेश बांदेकर ( ३०, रा.देवबाग मोबार , ता . मालवण ), यशवंत विष्णु देसाई (३७, रा . कणकवली, म्हाडगुत कॉम्प्लेक्स ) , निलेश मनोहर हेरेकर( ४२, रा .कणकवली शिवाजीनगर) ,संदीप रामचंद्र राणे( ४६,रा.कणकवली परबवाडी ),  जयन राजेंद्र सुतार ( २९, रा . कणकवली, कांबळेगल्ली) , प्रदीप राजेंद्र शिर्सेकर (३८, रा . मालवण धुरीवाडा ) ,संकेत अरविंद बांदेकर ( ३२ ,रा . कणकवली,परबवाडी), मोसीन नुरमहम्मद मुजावर (३४,रा.मालवण, मेढा ), राजेंद्र शशिकांत सावंत( ५० , रा . आवळेगाव ,देऊळवाडी ),  नदीम नुरमहम्मद मुजावर (३६ , रा . मालवण मेढा ), संतोष बाळकृष्ण चव्हाण( ४७, रा .कडावल,सुर्वेवाडी ), रमेश रामचंद्र येरागी( ४६, रा . देवबाग, मोबार )यांचा समावेश आहे.ही कारवाई कणकवली पोलिसांनीगनिमी काव्याचा वापर करीत केली.   पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांनी योग्य नियोजन करून ही धाड टाकली. या पथकात हवालदार दाजी सावंत,चंद्रकांत झोरे, पांडुरंग पांढरे , रुपेश गुरव, मनोज गुरव, किरण मेथे, कैलास इंफाळ, किरण कदम, चंद्रकांत माने आदी सहभागी झाले होते. ताब्यात घेतलेल्या सर्व मुद्देमालासह सर्व संशयित आरोपीना कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी