वादळी वाऱ्यामुळे भुईबावड्यात नुकसान
By Admin | Updated: October 1, 2014 00:48 IST2014-10-01T00:45:18+5:302014-10-01T00:48:08+5:30
रस्त्यावर झाडे पडून वाहतूक खोळंबली

वादळी वाऱ्यामुळे भुईबावड्यात नुकसान
भुईबावडा : सोमवारी सायंकाळी भुईबावडा भागात झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या वादळामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडून वाहतूक खोळंबली होती.
गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात दुपारनंतर विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होऊन पाऊस कोसळला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडले आहेत. अनेक ठिकाणी भातशेतीचे नुकसान झाल्याचे पहावयास मिळत आहे. कुसूर, उंबर्डे, तिरवडे, भुईबावडा भागात ऊस शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
या परिसरात अनेक ठिकाणी झाडे विद्युत तारांवर पडल्याने विद्युत पुरवठाही बंद होता. झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने वाहतूकही काही काळ ठप्प होती. मात्र, या वादळी पावसात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. (वार्ताहर)