गद्यात देवगड, पद्यात वेंगुर्ले संघ चमकले
By Admin | Updated: November 10, 2014 23:54 IST2014-11-10T23:20:35+5:302014-11-10T23:54:30+5:30
रंगसंगीत एकांकिका : कोकण विभागीय स्पर्धेचा निकाल जाहीर

गद्यात देवगड, पद्यात वेंगुर्ले संघ चमकले
कणकवली : येथील अक्षरसिंध कलामंच आणि थिएटर अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रंगसंगीत एकांकिका स्पर्धेच्या विभागीय स्पर्धेत समर्थ कलाविष्कार देवगडच्या ‘एंड आॅफ द बिगनिंग’ या एकांकिकेला गद्य विभागात तर अणसूर वेंगुर्ले येथील ‘संगीत भोमासूर वध’ या एकांकिकेला पद्य विभागात प्रथम क्रमांक मिळाला.
येथील मराठा मंडळ सभागृहात दोन दिवस ही स्पर्धा चालली. स्पर्धेत एकूण १२ संघांनी सहभाग घेतला होता. गद्य विभागात कलांकूर मालवण संघाच्या ‘सायलेन्स स्क्रिम’ला द्वितीय तर आयडियल इंग्लिश स्कूल कणकवलीच्या ‘क्लोन’ला तृतीय क्रमांक मिळाला. पद्य विभागात रंगखांब कणकवली संघाच्या ‘संगीत कवडसा’ला द्वितीय तर स्वप्नवेध युवा प्रतिष्ठान ओरोसच्या ‘संगीत नाते संस्कृतीचे’ला तृतीय क्रमांक मिळाला.
उत्कृष्ट अभिनेता म्हणून योगसिद्धार्थ पराडकर (लेखक-एंड आॅफ द बिगनिंग), उत्कृष्ट अभिनेत्री शुभदा पवार (मुक्ताई- सायलेंट स्क्रीम), उत्कृष्ट लेखक कुनाल जामसांडेकर, उत्कृष्ट दिग्दर्शन दुर्गेशा वरूणकर (क्लोन) यांना गौरविण्यात आले.
बक्षिस वितरण प्रसंगी थिएटर अकॅडमीचे सागर अत्रे, सुनिल देव, दिग्दर्शक सुहास वरूणकर यांच्यासह अक्षरसिंंधुचे अध्यक्ष प्रा.हरिभाऊ भिसे, कार्याध्यक्ष संजय राणे, किशोर कदम, संजय मालंडकर, निलेश महेंद्रकर, ऋषिकेश कोरडे, राजेश कदम, आशिष नाईक, प्रमोद पाटेकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कणकवली येथील अक्षरसिंध कलामंच आणि थिएटर अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रंगसंगीत एकांकिका स्पर्धेतील विजेत्या संघासमवेत सुहास वरूणकर, प्रा.हरिभाऊ भिसे, कार्याध्यक्ष संजय राणे, किशोर कदम, संजय मालंडकर, निलेश महेंद्रकर, ऋषिंकेश कोरडे, राजेश कदम, आशिष नाईक, प्रमोद पाटेकर आदी उपस्थित होते.