कणकवली बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 05:19 PM2020-11-14T17:19:21+5:302020-11-14T17:22:43+5:30

diwali, kankavli, market, sindhudurg, coronavirus दीपोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून धनत्रयोदशी दिवशी कणकवली बाजारपेठेत नागरीकांनी विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून येत होते. अशीच स्थिती कायम राहिल्यास कोरोनाची दुसरी लाट यायला वेळ लागणार नाही. असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

The fuss of social distance in Kankavli market | कणकवली बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कणकवली बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

googlenewsNext
ठळक मुद्देकणकवली बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाखरेदीसाठी गर्दी : नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

कणकवली : दीपोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून धनत्रयोदशी दिवशी कणकवलीबाजारपेठेत नागरीकांनी विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून येत होते. अशीच स्थिती कायम राहिल्यास कोरोनाची दुसरी लाट यायला वेळ लागणार नाही. असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून अधूनमधून केले जाणारे लॉकडाऊन यामुळे घरात बसून लोक कंटाळले आहेत. त्यामुळे आता बिनधास्त घराबाहेर पडत आहेत. मात्र, कोरोनापासून अनेक जण काळजी घेताना दिसत नाहीत. सकाळच्या सत्रात तसेच सायंकाळी ५ वाजल्यानंतर मोठी गर्दी बाजारपेठेत पहायला मिळाली. या गर्दीतील अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हता. तर अनेकांच्या गळ्यात मास्क अडकविलेला दिसून येत होता. त्यामुळे कोरोनाचा समूह संसर्ग वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. विक्रेत्यांनीही आपण मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करून ग्राहकांनाही त्याची आठवण करून देणे आवश्यक आहे. तरच
कोरोनावर नियंत्रण मिळविता येऊ शकेल.

दिवाळीनिमित्त मनसोक्त खरेदी

गणेशोत्सवात संयम पाळत अनेक नागरिकांनी तो सण साजरा केला. ज्यांनी नियम पाळले नाहीत त्यांच्यापैकी अनेकांना पुढील काळात कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे जास्त बाधित रुग्णही सापडले होते. मात्र, याचा विसर अनेक नागरिकांना पडला असून दिवाळीच्या निमित्ताने मनसोक्त खरेदी अगदी गर्दी करून केली जात आहे. त्याचा प्रत्यय शुक्रवारी कणकवली शहरात आला.
 

Web Title: The fuss of social distance in Kankavli market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.