शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

निधी केसरकरांचा, मग श्रेय तुमचे कसे? : शिवसेनेचा सवाल ; प्रभारी नगराध्यक्षांवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 11:39 IST

या विकासाच्या कामाचे श्रेय दीपक केसरकर यांना जाते. शहराचे आधुनिक शिल्पकार म्हणून दीपक केसरकर यांना ओळखले जाते. नगराध्यक्ष, आमदार, पालकमंत्री, राज्यमंत्री अशा सर्व वाटचालीत केसरकर यांनी शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे.

ठळक मुद्देअन्य कुणीही पत्रकार परिषद घेऊन विकासकामे मंजूर केल्याच्या थापा मारू नयेत, असा इशारा वारंग यांनी दिला.

सावंतवाडी : सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव आर्थिक निधी आणण्यासाठी माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी अथक प्रयत्न केले आहेत. शहराच्या विकासाचे आधुनिक शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यामुळे विकासाच्या मुद्यावर दुसऱ्या कोणी श्रेय घेऊ नये, अशी जोरदार टीका नगरपरिषद, आरोग्य व क्रीडा सभापती खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्यासह शिवसेना नगरसेवकांनी केली आहे.

सावंतवाडीच्या प्रभारी नगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी शहरातील विकासकामांसाठी चार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी बाबू कुडतरकर, माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश बिद्र्रे उपस्थित होते.

कुडतरकर म्हणाले, शहरात ४ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली. हा विकास निधी माजी अर्थराज्यमंत्री व पालकमंत्री या नात्याने दीपक केसरकर यांनी दिला आहे. तो अन्य कोणीही आणलेला नाही. या विकासाच्या कामाचे श्रेय दीपक केसरकर यांना जाते. शहराचे आधुनिक शिल्पकार म्हणून दीपक केसरकर यांना ओळखले जाते. नगराध्यक्ष, आमदार, पालकमंत्री, राज्यमंत्री अशा सर्व वाटचालीत केसरकर यांनी शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे.

त्यामुळे जनतेने त्यांना नगरसेवक, नगराध्यक्ष आणि आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सतत पाठिंबा दिलेला आहे, असे कुडतरकर म्हणाले. यावेळी शहराच्या विकासासाठी पालकमंत्री व राज्यमंत्री या नात्याने केसरकर यांनी केलेल्या कामांचा आढावा वारंग यांनी घेतला.श्रेय केसरकरांचेच!वारंग म्हणाले, सावंतवाडी शहराचा कायापालट करणारे प्रकल्प आमदार केसरकर यांनी आणले. शहरात विविध रोजगाराच्या प्रकल्पांना प्राधान्य देताना लहान मुलांना खेळण्यासाठी बालोद्यानदेखील निर्माण केले. रघुनाथ मार्केट, जिमखाना क्रीडांगण अशा अनेक प्रकल्पांना केसरकर यांनीच पुढाकार घेऊन निधी आणला आणि शहराचा विकास केला. त्यामुळे विकासाचे श्रेय त्यांचेच आहे. अन्य कुणीही पत्रकार परिषद घेऊन विकासकामे मंजूर केल्याच्या थापा मारू नयेत, असा इशारा वारंग यांनी दिला.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाfundsनिधीkonkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग