शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 14:20 IST

कुडाळ : मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळी सणात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला ...

ठळक मुद्देशासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा जिल्ह्यातील ग्रामस्थांची मागणी

कुडाळ : मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळी सणात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून नेल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पसरली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शासनाने तातडीने मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्याची मागणी जिल्ह्यातील ग्रामस्थांतून होत आहे.सिंधुदुर्गातील प्रमुख पीक म्हणून भातशेती केली जात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो एकर क्षेत्रावर ही भातशेती केली जाते. अनेक शेतकरी या भातशेतीवर अवलंबून आहेत. आता भातशेती जवळपास पूर्ण परिपक्व असून त्याची कापणी होणे गरजेचे असतानाच गेले काही दिवस मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात १० टक्केही भातकापणी झालेली नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.खरेतर कोकणातील शेतकरी हा कणखर मानला जातो. कोणतीही नैसर्गिक आपत्ती येऊ द्या किंवा काही होऊ द्या, मात्र येथील शेतकरी पुन्हा उभा राहून असलेल्या संकटावर मात करतो अशी येथील शेतकऱ्यांची ओळख आहे.मात्र, यावर्षी पाऊसच नव्हे तर वादळाबरोबर आलेल्या पावसामुळे कापणीसाठी तयार असलेले भातपीक जमीनदोस्त झाले.

सतत पडणाऱ्या पावसामुळे भातपीक कुजून जात आहे. काही ठिकाणी भातपिकाला आता कोंब आले आहेत. त्यामुळे आता या भातपिकापासून कोणताही फायदा येथील शेतकऱ्यांना होणार नसल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जून महिन्यापासून मेहनत घेऊन भातशेती केली. आता ती पूर्ण होत असताना या पावसाने घास हिरावून घेतला. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना आता रडू कोसळत आहे. या शेतकऱ्यांचे अश्रू आता सरकार पुसणार का? या शेतकऱ्यासाठी सरकार तातडीने आर्थिक मदत जाहीर करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.जिल्ह्यातील भातशेतीची कापणी आतापर्यंत १० टक्केही झाली नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. तसेच अतिवृष्टीची नोंद झाली तरच येथील शेतकऱ्यांना मदत मिळू शकते असेही कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अतिवृष्टीची नोंद झाली तरच त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार का? असा सवाल केला जात आहे.लवकरात लवकर प्रशासनाने येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करून त्याचा पंचनामा करून अहवाल तयार करून तातडीने श्सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींकडून तातडीने ओला दुष्काळाची तक्रार देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे व या मागणीला सरकार आता सकारात्मक प्रतिसाद देतो का हे लवकरच कळणार आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग