शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

कोविड रुग्णांना घरापासून ते कोविड सेंटरपर्यंत मोफत रुग्णवाहिकेची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 14:27 IST

Coronavirus Kankavli Sindhudrug : शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण व कोविड आजाराने मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना होणारा त्रास विचारात घेत कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवली शहरातील रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.यात कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना घर ते रुग्णालय अथवा कोविड सेंटर वर जाण्यासाठी वाहन व्यवस्था केली जाणार आहे. 

ठळक मुद्देकोविड रुग्णांना घरापासून ते कोविड सेंटरपर्यंत मोफत रुग्णवाहिकेची व्यवस्थानगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यामार्फत कोविड मृत रुग्णांनाही शव वाहिनीची व्यवस्था

कणकवली : शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण व कोविड आजाराने मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना होणारा त्रास विचारात घेत कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवली शहरातील रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.यात कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना घर ते रुग्णालय अथवा कोविड सेंटर वर जाण्यासाठी वाहन व्यवस्था केली जाणार आहे. 

कोविड मृत रुग्ण आणण्यासाठी शववाहिनी उपलब्ध करून दिली जाणार आहे.कोविड पॉझिटिव्ह तसेच कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची परवड होऊ नये यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे श्री.नलावडे म्हणाले. याबाबतची अंमलबजावणी देखील गेले चार दिवसापासून सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.👉कोविड पॉझिटिव्ह मृत रुग्णाला जिल्हा रुग्णालय किंवा शिरवल, हरकूळ बु. येथील कोविड सेंटरमधून कणकवली येथील स्मशानभूमीत आणण्यासाठी खाजगी रुग्णवाहिकेकडून सुमारे 10 ते 15 हजार रुपयांची मागणी केली जाते. तसेच कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटर किंवा जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्याकरिता रुग्णवाहिकेचे वारेमाप भाडे घेतले जाते.

कोविडमुळे अनेकांच्या हाताची रोजीरोटी गेलेली असतानाच, त्यात करून अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिकेचे भाडे भरणे रूग्ण किंवा मृत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना शक्य होत नाही.त्यामुळे जिल्हा रुग्णालय, शिरवल व हरकुळ बुद्रुक येथील कोविड केअर सेंटर या ठिकाणी कणकवली शहरातील दाखल करायच्या रुग्णांना घरापासून ते कोविड सेंटरपर्यंत नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यामार्फत मोफत रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे.

या तीनही ठिकाणी जर या आजारामुळे कणकवली शहरातील रुग्णाचे निधन झाले. तर, त्या रुग्णाला त्या ठिकाणाहून कणकवली स्मशानभूमी पर्यंत रुग्णवाहिकेत द्वारे मोफत आणण्याची व्यवस्था देखील नगराध्यक्ष श्री नलावडे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.कणकवली शहरातील कोविड पॉझिटीव्ह आल्यानंतर ज्या रुग्णांना कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी जायचे असेल किंवा शहरातील कोविड ने मृत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी याबाबत थेट माझ्याशी ( ९४२०२०६४६४) या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन नगराध्यक्ष नलावडे यांनी केले आहे.

गेले चार दिवस नगराध्यक्ष. नलावडे यांच्या माध्यमातून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून, बाळा वळंजू मित्रमंडळची रुग्णवाहिका यासाठी उपलब्ध करून ठेवण्यात आली असल्याचे नलावडे यांनी सांगितले. कणकवली शहरातील कोविडच्या सर्वच रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे नलावडे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग