शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सिंधुदुर्ग: व्यवसायात भागीदार बनवण्याचे आमिष दाखवत तरुणीला घातला गंडा, एकावर गुन्हा दाखल

By सुधीर राणे | Updated: November 5, 2022 13:47 IST

१ लाखाची रोख रक्कम असे सुमारे ३ लाख ६० हजार रुपयाला घातला गंडा

कणकवली: तालुक्यातील कलमठ येथील वीस वर्षीय तरुणीला कणकवलीत सॅनिटरी नॅपकीनचे दुकान चालू करुन त्यात भागीदार बनवतो असे आमिष दाखवत तिच्याकडून २ लाख ६० हजाराचा धनादेश आणि १ लाखाची रोख रक्कम असे सुमारे ३ लाख ६० हजार रुपयाला गंडा घातला. याप्रकरणी अल्फीझा हेल्थ केअर प्रा. लि. या कंपनीचा सीईओ हसन अलीवणू (रा. साटवली, लांजा) याच्याविरुध्द कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हि घटना २४ मे ते २ जून २०२२ या कालावधीत घडली.फसवणूक झालेल्या त्या तरुणीच्या ओळखीच्या व्यक्तीने सॅनिटरी नॅपकिनबाबत तिला माहिती दिली होती. त्यातून या कंपनीच्या सीईओशी तीचा संपर्क झाला. दरम्यानच्या कालावधीत संशयित हसन अलीवणू याने तिचा विश्वास संपादन केला. आपल्या कंपनीचे सॅनिटरी नॅपकीनचे  दुकान कणकवलीत चालू करायचे आहे. त्यामध्ये भागीदार व्हा. त्यात तुमचा फायदा असल्याचे सांगत आमिष दाखवले. त्यानंतर तिच्या वडीलांशी संपर्क साधून काही रक्कम जमा करावी लागेल असे सांगितले.त्यानुसार त्याच्यावर विश्वास ठेवून त्या युवतीने बँकेचा धनादेश आणि रोख स्वरुपात ३ लाख ६० हजाराची रक्कम त्याला दिली. नंतरच्या काळात त्याने आपला भ्रमणध्वनी बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने याप्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित हसन अलीवणू याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी