चौदा जणांना अटक
By Admin | Updated: November 4, 2015 00:08 IST2015-11-03T21:49:14+5:302015-11-04T00:08:27+5:30
आचरा येथील राडा : दहा महिलांचा समावेश, अटकसत्र जोरदार

चौदा जणांना अटक
आचरा : आचरा बंदरजेटी येथे पर्ससीन व्यावसायिकांना करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणी आणखी १४ जणांना अटक करण्यात आली. यामध्ये १० महिलांचा समावेश आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता अटक करण्यात आली. याप्रकरणी संशयितांचा पोलीस कसून शोध घेत असून जादा प्रमाणात पोलीस फोर्स आचऱ्यात दाखल असून अटक सत्राला जोरदार वेग आला आहे.
मंगळवारी नव्याने अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोहन बाबुराव सारंग (वय ५२, आचरा पिरावाडी), विठ्ठल मोहन सारंग (वय ३१, आचरा पिरावाडी), अरुण बाबुराव सारंग (वय ६२, आचरा पिरावाडी), सत्यवान अर्जुन पराडकर (वय ६३, आचरा पिरावाडी), मंदाकिनी रामचंद्र निकम (वय ५३, आचरा पिरावाडी), सुषमा कालिदास कोळंबकर (वय ५५, आचरा पिरावाडी), वसुंधरा वासुदेव कमळे (वय ४०, आचरा पिरावाडी), कविता अरुण सारंग (वय ५८, आचरा पिरावाडी), सिमाली सूर्यकांत चोपडेकर (वय ४७, आचरा पिरावाडी), समिता शैलेश सारंग (वय २७, आचरा पिरावाडी), छाया सत्यवान पराडकर (वय ५५, आचरा पिरावाडी), नमिता नारायण कुमठेकर (वय ५३), प्रतिक्षा प्रविण सारंग (वय ४५, आचरा पिरावाडी), माधुरी मोहन सारंग (वय ४०, आचरा पिरावाडी) यांना अटक करण्यात आली असून बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी सांगितले की, सोमवारी ओरोस येथे रुग्णालयात विजय ढोके यांचा जबाब नोंदवण्यासाठी गेलो होतो. परंतु ते बोलण्याच्या स्थितीत नसल्याने त्यांनी आपला जबाब दिला नाही. आचरा पोलीस योग्य दिशेने कारवाई करत असून सीसीटीव्ही फुटेज, फोटो व पुराव्याच्या आधारेच कारवाई केली जात आहे. (वार्ताहर)
एकतर्फी कारवाई नको : बबन शिंदे यांची मागणी
आचरा पोलिसांनी जोरदार मोहीम राबवत अटकसत्र राबवून १४ जणांना अटक केल्यावर मनसे, शिवसेना नेत्यांनी आचरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी मनसे नेते परशुराम उपरकर यांनी पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांची भेट घेत पारंपरिक मच्छिमारांवर हल्ला करणाऱ्यांवरही तुम्ही कारवाई करा. विजय ढोके याचा जबाब नोंदवून कारवाई कधी करणार अशी विचारणा केली. तर शिवसेना मालवण तालुकाप्रमुख बबन शिंदे यांनी आचरा पोलिसांनी पारंपरिक मच्छिमारांवर एकतर्फी कारवाई करू नये अशी मागणी केली. यावेळी उदय दुखंडे, अरविंद घाडी, राजू नार्वेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.