शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

सिंधुदुर्गमधील चार युवक बनले स्कुबा डायव्हिंग इन्स्ट्रक्टर, अंदमानमध्ये पूर्ण केले प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 11:49 IST

जिल्ह्याच्या स्कुबा डायव्हिंग क्षेत्रात मानाचा तुरा

संदीप बोडवेमालवण : सिंधुदुर्गच्या स्कुबा डायव्हिंग क्षेत्रात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्कुबा डायव्हिंग क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण असा समजला जाणारा ‘स्कुबा डायव्हिंग इन्स्ट्रक्टर’ बनण्याचा मान सिंधुदुर्गमधील चार युवकांनी प्राप्त केला आहे.एमटीडीसीच्या मालवण येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड ॲक्वाटिक स्पोर्ट्स अर्थात, इसदाच्या स्थापनेपासून येथील युवकांना स्कुबा डायव्हिंगमधील विविध प्रकारचे प्रशिक्षण स्थानिक पातळीवर मिळणे शक्य झाले आहे. इसदामध्ये प्रशिक्षण घेऊन येथील अनुभवाच्या जोरावर सिंधुदुर्गमधून काही मोजकेच स्कुबा ड्रायव्हिंग प्रशिक्षक तयार झाले आहेत. यात स्कुबा प्रशिक्षकांमध्ये ऋतुज देऊलकर (मालवण), विवान राणे (कणकवली), अंतोन काळसेकर (मालवण), नारायण पराडकर (निवती) या युवकांची भर पडली आहे.

अंदमानमध्ये केले प्रशिक्षण पूर्ण..स्कुबा डायव्हिंगमधील प्राथमिक प्रशिक्षण आणि डाइव्ह मास्टरपर्यंतचा टप्पा पूर्ण केल्यानंतर स्कुबा प्रशिक्षकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी व त्याची परीक्षा देण्यासाठी अंदमानमध्ये व्यवस्था आहे. स्कुबा डायव्हिंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय मानांकित पॅडी या संस्थेच्या विशेष प्रशिक्षकाद्वारे या कोर्सचे परीक्षण केले जाते.

दर्जेदार स्कुबा डायव्हर्स बनतीलस्कुबा डायव्हिंगमधील प्रशिक्षणार्थींना हाताळण्याबरोबरच ओपन वॉटर, ॲडव्हान्स ओपन वॉटर, इमर्जन्सी फर्स्ट रिस्पॉन्डट आणि ड्राइव्ह मास्टरपर्यंतचे प्रशिक्षण देण्यासाठी स्कुबा इन्स्ट्रक्टरला तयार करण्यात येते.

एसओपी तयार करण्यात होईल मदत..सिंधुदुर्गमधून मोठा अनुभव बाळगून दर्जेदार असे स्कुबा प्रशिक्षक तयार होत आहेत. या स्कुबा प्रशिक्षकांसोबत काम करून पर्यटन संचलनालय आणि महाराष्ट्र सागरी मंडळाने सिंधुदुर्गच्या किंबहुना महाराष्ट्राच्या जलपर्यटनासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार केल्यास जिल्ह्याच्या सागरी पर्यटनास मोठा फायदा होऊ शकतो, असे मत पर्यटन तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

आता इसदामध्ये मिळणार ॲडव्हान्स प्रशिक्षणपुढील वर्षापासून इसदामध्ये स्कुबा डायव्हिंगसोबतच स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षक, पावर बोट हँडलिंग, जेट स्की, लाइफ सेव्हिंग टेक्निक यांचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे. एमटीडीसीच्या या प्रशिक्षण उपक्रमाचा स्थानिकांना मोठा फायदा होईल. - सूरज भोसले, व्यवस्थापक इसदा, मालवण.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनारा