शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

कुडाळ बाजारपेठेतील चार दुकाने फोडली, अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 21:44 IST

बाजारपेठेतील चार मोठी दुकाने चोरट्यांनी सोमवारी रात्री फोडून ५० हजार रुपयांच्या रोख रकमेसह सुमारे २.५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

कुडाळ : बाजारपेठेतील चार मोठी दुकाने चोरट्यांनी सोमवारी रात्री फोडून ५० हजार रुपयांच्या रोख रकमेसह सुमारे २.५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. पोलिसांची गस्त सुरू असताना झालेल्या या चोरीमुळे तपासाचे आव्हान असून येथील दुकानदारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटे या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कुडाळ बाजारपेठेतील रेणुका स्वीट मार्ट, कुडाळ मेडिकल, धडाम यांचे दुकान व मनीष फोटो स्टुडिओ अशी चार दुकाने एकाच रात्रीत फोडली. मंगळवारी सकाळी मालकांनी दुकाने उघडल्यावर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात तत्काळ माहिती देण्यात आली.रेणुका स्वीट मार्टचे मालक जालिमसिंह पुरोहित यांनी तक्रार दिली. कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जी. जी. पाटील तसेच पोलीस एस. डिसोजा व इतर पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. कुडाळ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांच्या तपासासाठी पाचारण केलेल्या पथकातील श्वान रेणुका स्वीट मार्टकडून कुडाळ एसटी स्थानकाच्या परिसरात घुटमळले. ठसे तज्ञ्ज्ञांनीही परिसरातील काही ठिकाणच्या ठशांचे नमुने घेतले आहेत.रेणुका स्वीट मार्ट या दुकानाच्या एका खिडकीचे लोखंडी गज कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. या दुकानातील रोख ३५ हजार रुपये तसेच सुमारे ३८ हजार रूपयांचा लॅपटॉप व मोठ्या प्रमाणात काजूची पाकिटे चोरून नेली. याच दुकानाच्या बाजूला असलेल्या मनोहर कामत यांच्या कुडाळ मेडिकल दुकानाचे शटरचे तोडून चोरट्यांनी या दुकानात प्रवेश करून रोख सहा हजार रूपयांची रक्कम व सुमारे पाच हजार रूपयांचे बॉडी स्प्रेच्या बाटल्या लंपास केल्या.याच बाजारपेठेतील एका इमारतीच्या गाळ््यात असलेल्या सुरज खुडपकर यांच्या मनीष फोटो स्टुडिओच्या शटरची लोखंडी पट्टी कापून निकॉन डी-९० व डी-४० कंपनीचे दोन कॅमेरे व लेन्स मिळून सुमारे १ लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. धडाम यांच्या स्वरूपानंद ट्रेडर्स या दुकानाच्या शटरला असलेली कुलपे न तुटल्याने या दुकानात चोरीचा प्रयत्न फसला.चोरट्यांची टोळी असण्याची शक्यताएकाच रात्रीत चार दुकाने फोडणे एकट्या-दुकट्यचो काम नसल्याने या चोरीमध्ये चोरट्यांची टोळी असण्याची दाट शक्यता आहे. बाजारपेठेतील या मार्गावर लावण्यात आलेल्या सर्व दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास चोरट्यांचा छडा लागू शकतो, अशी चर्चा नागरिकांत होती.सीसीटीव्हीत एक चोरटा कैदरेणुका स्वीट मार्टमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुकानातील पैसे चोरताना चोरटा कैद झाला आहे. त्याने पांढरा सदरा घातला असून डोक्याला व तोंडाला पांढरा कापड गुंडाळल्याचे दिसत आहे. पोलिसांची गस्त असलेल्या तसेच रहदारी व भरवस्तीमधील दुकानात ही चोरी झाली असून या चोरट्यांचा शोध घेणे कुडाळ पोलिसांना आव्हान ठरणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcctvसीसीटीव्हीRobberyदरोडा