शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

खारेपाटणनजीक चारचाकी दरीत कोसळून ५ जण गंभीर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2017 22:52 IST

कणकवली तालुक्यातील खारेपाटणपासून ३ किलोमीटर अंतरावरील नडगिवे येथे मुंबईहून आचरा (वायंगणी) येथे जाणारी चारचाकी गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाला

कणकवली - तालुक्यातील खारेपाटणपासून ३ किलोमीटर अंतरावरील नडगिवे येथे मुंबईहून आचरा (वायंगणी) येथे जाणारी चारचाकी गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात चारचाकीमधील २ महिला, २ पुरुष व एक मुलगी गंभीर जखमी झाली आहेत. हा अपघात सायंकाळी सायंकाळी ५.३0 च्या सुमारास घडला.मुंबई प्रभादेवी येथून अमर विनायक सूर्यवंशी हे आपली चारचाकी घेऊन आचरा येथे जाण्यास निघाले होते. सायंकाळी ५.३0 च्या दरम्यान नडगिवेनजीक एका अवघड वळणावर आले असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटून रस्त्यावरील कठडा तोडून चारचाकी सुमारे २0 फूट खोल दरीत कोसळली.गाडीतील प्रवासी प्राजक्ता अमर सूर्यवंशी, अमर विनायक सूर्यवंशी, प्रभाकर शंकर चव्हाण, प्रणिता प्रभाकर चव्हाण, दुर्वा अमर सूर्यवंशी हे गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम खारेपाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी खारेपाटण येथील डॉ. रानडे व डॉ. प्रिया पेडणेकर यांना बोलावण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यांना कणकवली येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले. खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी रुग्णांना दवाखान्यात आणण्यासाठी मदत केली.

टॅग्स :Accidentअपघात