शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

काडतुसाच्या बंदुकीसह चारजण जेरबंद, सव्वा सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

By अनंत खं.जाधव | Updated: April 24, 2023 18:54 IST

सावंतवाडी : कुडाळ तालुक्यातील कडावल बाजारपेठेत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कारवाई करत दोन अवैद्य काडतुसांच्या बंदुकीसह चारजणांना जेरबंद केले. ...

सावंतवाडी : कुडाळ तालुक्यातील कडावल बाजारपेठेत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कारवाई करत दोन अवैद्य काडतुसांच्या बंदुकीसह चारजणांना जेरबंद केले. तसेच त्याच्याकडून १३ जिवंत काडतुसे, एक कार, दुचाकी व इतर साहित्य असा 6 लाख 14 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई काल, रविवारी पहाटेच्या सुमारास केली.सिंधुदुर्ग जिल्हयात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर पाळत ठेवून कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक याच्याकडून देण्यात आलेल्या होत्या.  स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला गृप्त माहितीच्या आधारे पंग्रड जंगलात कुडाळ येथील काही इसम कार व मोटार सायकलने जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी गेले असल्याची माहीती मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी अलर्ट होत पाठलाग केला याच वेळी कडावल बाजारपेठेत सापळा रचून अजित लाडोबा तांबे (५५ वर्षे, रा. वक्रतुंड कॉम्पेक्स, कुडाळ), दत्ताराम संभाजी परब (५० वर्षे, रा. वक्रतुंड संकुल, लक्षीवाडी, कुडाळ ), सिध्देश सुरेश गावडे ( २४ वर्षे, रा. अणसुर, टेंबवाडी, वेंगुर्ला ), नारायण प्रकाश राउळ, (१९ वर्षे, रा. तेंडोली, खरातवाडी, कुडाळ) या चौघांना ही ताब्यात घेण्यात आले.हे चौघे पांग्रडवरुन कुडाळकडे एक कार ने व दुचाकी ने जात असतना वाहाने थांबवून  तपासणी केली असता  त्याच्याकडे  दोन काडतूस बंदूका व १३ जीवंत काडतूसे  आढळून आली ती हस्तगत करण्यात आली असून कार दुचाकीसह ६,१४, हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई करण्याबाबत सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक, सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे स्थानिक गुन्हा अन्वेषण चे पोलीस निरीक्षक संदिप भोसले  सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, सहा. पोलीस उप निरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस हवालदार प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रमोद काळसेकर, पोलीस अंमलदार प्रथमेश गावडे, यशवंत आरमारकर यांनी ही कारवाई केली. संशयित आरोपींविरुध्द कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस