कणकवलीत साडेचार लाखांची दारू जप्त
By Admin | Updated: June 6, 2014 00:10 IST2014-06-06T00:03:53+5:302014-06-06T00:10:16+5:30
चौघांना अटक : गोडावूनवर छापा : १0 जूनपर्यंत कोठडी

कणकवलीत साडेचार लाखांची दारू जप्त
कणकवली : कणकवली पोलिसांनी शिवाजीनगरात छापा टाकून साडेचार लाखांच्या दारूसाठ्यासह अल्टो कार जप्त केली. याप्रकरणी चौघांना अटकही केली. न्यायालयाने त्यांची १० जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांच्या पथकाने शिवाजीनगर येथील विलास हुन्नरे यांच्या घरावर आज, गुरूवारी सकाळी ८ वाजता छापा टाकला. यावेळी निळ्या रंगाच्या अल्टो कारमधून (एम.एच.0७ क्यू ५९७७) गोवा बनावटीची दारू हुन्नरे यांच्याकडे उतरवली जात होती. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करण्याबरोबरच हुन्नरेच्या गोडावूनमध्येही छापा टाकून तेथील दारूचे बॉक्सही जप्त केले. एकूण ४ लाख ५१ हजार २00 रुपयांचे डॉक्टर ब्रॅँडी, अॅपल व्होडका, हनी गाईड व्हिस्की, नॅशनल डॉक्टर ब्रॅँडी, हॅवॅर्ड ५५५, इम्पेरिअल ब्ल्यू व्हिस्की, रोमानोव्ह व्होडकाच्या बाटल्यांचे बॉक्स या अल्टो कारमधून आणि हुन्नरेच्या गोडावूनमधून जप्त करण्यात आले.
याप्रकरणी विलास रामचंद्र हुन्नरे (६२, शिवाजीनगर, कणकवली), जावेद पिरसाब शेख (रा.मोरेडोंगरी, गरड, सावंतवाडी), कृष्णा प्रकाश केसरकर (२४, रा.गावठणवाडी, डिगस, कुडाळ), यांच्यासह अल्टो गाडीमालक राजकुमार बाबुराव चव्हाण (३४, रा.कोलगांव, सावंतवाडी) यास पोलिसांनी अटक केली. (प्रतिनिधी)