कुडाळ येथे रविवारपासून चार दिवस एकांकिका स्पर्धा

By Admin | Updated: December 31, 2015 00:21 IST2015-12-30T22:18:48+5:302015-12-31T00:21:04+5:30

नाट्यक्षेत्रात भरीव कामगिरी करणारे नाट्य कलावंत विजय कुडाळकर व उमेश पावसकर या कलाकारांची स्मृती जपावी या उद्देशाने

Four days of single day competition in Kudal Sunday | कुडाळ येथे रविवारपासून चार दिवस एकांकिका स्पर्धा

कुडाळ येथे रविवारपासून चार दिवस एकांकिका स्पर्धा

कुडाळ : येथील निर्मिती थिएटर्सच्या वतीने नाट्यकलाकार विजय कुडाळकर व उमेश पावसकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ३, ४, ५, ६ जानेवारी २०१६ या कालावधीत आयोजित केल्याची माहिती प्रसिद्धिपत्रकातून निर्मिती थिएटर्सचे नागेश नाईक यांनी दिली. कुडाळातील नाट्यक्षेत्रात भरीव कामगिरी करणारे नाट्य कलावंत विजय कुडाळकर व उमेश पावसकर यांनी या जगाच्या पाठीवरून अचानक एक्झिट घेतली. या कलाकारांची स्मृती जपावी या उद्देशाने कुडाळच्या निर्मिती थिएटर्सच्यावतीने राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन कुडाळ येथील मराठा समाज सांस्कृतिक भवन येथे दररोज चार एकांकिका सादर होणार आहेत.तीन जानेवारीला सायंकाळी ७ वाजता एम फॉर सिम्पथी (चौथी विंग्ज, पुणे), ८ वाजता भजीपाव, (चेतना महाविद्यालय मुंबई), रात्री ९ वाजता पाझर (अंतरंग थिएटर्स मुंबई), रात्री १० वाजता तुम्ही आॅर नॉट टू मी (रंगोद्य रूपांतर मुंबई) या एकांकिका सादर होणार आहेत. चार जानेवारीला सायंकाळी ७ वाजता ईश्वर साक्ष (थिएटर्स वर्कशॉप कंपनी पुणे), रात्री ८ वाजता मला उत्तर हवंय, (व्ह्यू फाउंडर थिएटर्स मुंबई), रात्री ९ वाजता ऐन आषाढात पंढरपूर (आचरेकर प्रतिष्ठान कणकवली), रात्री १० वाजता बम भोले (अभिनय संस्कार मुंबई) या एकांकिका सादर होणार आहेत. पाच जानेवारीला सायंकाळी ७ वाजता उजेड फुला (कला साधक- कोल्हापूर) रात्री ८ वाजता टिक टिक (मैत्री पुरळ - देवगड), रात्री ९ वाजता दहा वाजून दहा मिनिटे (समर्थ कला आविष्कार - देवगड) रात्री १0 वाजता साकव, (कलांकुर- मालवण), रात्री ११ वाजता लव्ह (सिद्धांत, कुडाळ) या एकांकिका होणार आहेत.
६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता फुटपाथ (सांजप्रभा प्रतिष्ठान, चंद्रपूर), रात्री ८ वाजता बुरगुंडा (चंद्र्रभागा थिएटर्स, कणकवली) रात्री ९ वाजता गिमिक (रसिका रंगभूमी रत्नागिरी) रात्री १० वाजता आर्टिफीशियल इंटिलिजन्स (अक्षर सिंधू कलामंच, कणकवली) या एकांकिका होणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Four days of single day competition in Kudal Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.