‘त्या’ संशयिताना चार दिवसांची पोलीस कोठडी

By Admin | Updated: November 6, 2015 23:37 IST2015-11-06T23:03:36+5:302015-11-06T23:37:42+5:30

जेलभरो आंदोलन आमदारांच्या यशस्वी शिष्टाईने स्थगित

Four days police detention of 'those' suspects | ‘त्या’ संशयिताना चार दिवसांची पोलीस कोठडी

‘त्या’ संशयिताना चार दिवसांची पोलीस कोठडी

मालवण : जेलभरो आंदोलन आमदारांच्या यशस्वी शिष्टाईने स्थगित करण्यात आले. मात्र पोलिसांनी अटकसत्र सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. पोलिसांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शुक्रवार सायंकाळी चार संशयितांनी पोलीस ठाण्यात हजर होत अटक करून घेतली. या चारही संशयिताना मालवण न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच गुरुवारी रात्री अटक केलेल्या संशयितानाही ९ नोव्हेंबर पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान पोलीस कोठडीत असलेल्या १५ संशयितांची न्यायालयीन कोठडी नंतर सावंतवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सायंकाळी अन्वय प्रभू, सन्मेश परब, रश्मिन रोगे, महेश हुर्णेकर, व गुरूवारी अटक केलेल्या विकी तोरसकर, विष्णू कुबल, किरण वेंगुर्लेकर, रतनकुमार माणगावकर, हर्षराज शिर्सेकर, या ९ संशयित आरोपीना न्यायालयात हजर करण्यात आले. तर पोलीस कोठडीची मुदत संपलेल्या १५ संशयितानाही न्यायालयात हजर करण्यात आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Four days police detention of 'those' suspects