शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू रेल्वे गाडीचे चार डबे सुटले, सावंतवाडी रेल्वे स्टेशनजवळील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 16:52 IST

सुदैवाने वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली

सावंतवाडी : कोळसा वाहतूक करणाऱ्या मालवाहू रेल्वे गाडीचे चार डबे स्टेशनवर सुटल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारच्या सुमारास सावंतवाडी रेल्वे स्टेशनजवळ घडला. सुदैवाने वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर हे डबे तत्काळ जोडून ही मालवाहतूक रेल्वे गोव्याच्या दिशेने रवाना झाली असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.गोव्याच्या दिशेने जात असलेल्या कोळसावाहू मालवाहू रेल्वे गाडीचे चार डबे सुटून स्टेशनवर राहिले. शुक्रवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्टेशनपासून अलीकडे या गाडीच्या काही लोखंडी पट्टी खांबाला अडकून मोठा आवाज झाला. त्यानंतर चार डबे सुटले. या डब्यांच्या मागे गार्ड केबिनही नव्हती. या घटनेनंतर गाडी थांबविण्यात आली.रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानी डबे जोडून गाडी पूर्ववत केली. मालवाहतूक करत असलेल्या या रेल्वेला डबल इंजिन नसल्याने हा प्रकार मोटरमनच्या लक्षात आला नसल्याचे सांगितले जात आहे; मात्र स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची कल्पना मोटरमनला दिली. या घटनेबाबत रेल्वेकडून चौकशी करण्यात येत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गrailwayरेल्वे