शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

Sindhudurg: महायुतीत असूनही पालकमंत्र्यांचे सहकार्य नाही, माजी खासदार सुधीर सावंतांनी व्यक्त केली खंत

By सुधीर राणे | Updated: December 20, 2023 16:13 IST

कणकवली: राज्यात भाजप , शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट)या महायुतीचे सरकार आहे. आम्ही महायुतीत असूनही जिल्ह्याचे ...

कणकवली: राज्यात भाजप ,शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट)या महायुतीचे सरकार आहे. आम्ही महायुतीत असूनही जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आम्हाला म्हणावे तसे सहकार्य लाभत नाही. त्यांनी उत्तर सिंधुदुर्ग मधील कणकवलीसह पाच तालुक्यातील विकासकामांबाबत लक्ष द्यावे. तसेच त्यांनी या भागाला मदत करावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केली.    कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा प्रमुख महिंद्र सावंत, प्रा. विलास सावंत, किसन मांजरेकर आदी उपस्थित होते. सुधीर सावंत म्हणाले, मालवण येथील नौदलाच्या कार्यक्रमावेळी पंतप्रधान सिंधुदुर्ग किल्ला नुतनीकरणाच्या अनुषंगाने काही करतील, अशी अपेक्षा होती. मात्र,तसे काही झालेले नाही. किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी यंत्रणा बनविण्याची आमची मागणीही होती .त्याबाबतचे निवेदन आम्ही त्यांना दिले. जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टी दिवसेंदिवस उध्वस्थ होत चालली आहे. त्यामुळे समुद्र किनारा संरक्षित करण्याची गरज आहे. ओरोस तसेच अन्य शहरांच्या विकासाकडे कोणाचेच लक्ष नाही. जिल्हयातील अनेक जटील प्रश्न, धरणांसाठी निधी अशा अनेक गोष्टी असून यासाठी पालकमंत्र्यांनी एकत्रित बैठक घेऊन लोकसभा आचारसंहितेपूर्वीच्या दोन महिन्यात जेवढे होईल, तेवढे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे जनतेच्या हिताच्या दृष्टीने येथील विकासकामे मार्गी लागतील असेही सावंत म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गguardian ministerपालक मंत्रीShiv Senaशिवसेना