शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्ते मॅन ऑफ दी मॅचचे मानकरी, एकटे केसरकर नाहीत - राजन तेली 

By अनंत खं.जाधव | Updated: June 8, 2024 16:29 IST

राणे यांना सावंतवाडी मतदारसंघातून मताधिक्य, आमदार नितेश राणे यांनी विजयाचे श्रेय केसरकर यांना दिले होते

सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना सावंतवाडी मतदारसंघातून भरघोस मताधिक्य मिळाले त्याचे खरे श्रेय कार्यकर्त्यांना दिले पाहिजे तेच खरे मॅन ऑफ दी मॅचचे मानकरी आहेत. एकट्या दीपक केसरकर यांना यांचे खरे श्रेय कसे? असा सवाल आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्यावर माजी आमदार राजन तेली यांनी उपस्थित केला.तसेच कुणाला उमेदवारी हवी असल्यास पक्षाकडे मागा पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी मिळत नाही असा सल्ला ही तेली यांनी संजू परब यांना दिला. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आमदार नितेश राणे यांनी या विजयाचे श्रेय दीपक केसरकर यांना दिले होते. त्यावर शनिवारी तेली यांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तेली म्हणाले, खरे म्हणजे शिंदे सेना व भाजप एकत्र आल्याने सावंतवाडी मतदारसंघात एक लाख मताचा टप्पा गाठणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही. याची कारणमिमांसा केली जाईल पण जी मते पडली त्यामागे तळागाळातील विकास हेच मुख्य कारण आहे. त्याच बरोबर कार्यकर्त्यांची मेहनत ही म्हणावी लागेल. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मोठ्याप्रमाणात निधी गावागावात दिला. त्यामुळे लोकांची कामे झाली. पूर्वी भाजप कार्यकर्त्यांना निधीसाठी झगडावे लागत होते. पण आता तसे होत नाही असे म्हणत त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली.2014 पूर्वी सावंतवाडी तालुक्यात भाजपची एकमेव ग्रामपंचायत निवडून यायची पण आता येथे शतप्रतिशत भाजप असून हे सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभे करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीतील यश हे एकट्या दीपक केसरकर यांचे नसून शिंदे शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांचे असल्याचे तेली यांनी स्पष्ट केले.दरम्यान, राणे निवडून आल्याने आता विकास कामे जलद गतीने होतील रोजगार येतील आम्ही खास करुन आडाळी येथील एमआयडीसीत वेगवेगळे प्रकल्प आले पाहिजेत. लोकांचा रोजगाराचा प्रश्न सुटला पाहिजे यासाठी आग्रही असणार असून लवकरच या विषयासाठी खासदार नारायण राणे यांची भेट घेणार असल्याचे तेली यांनी सांगितले.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागात चांगले मताधिक्य लोकसभा निवडणुकीत झाले पण शहरी भागात आम्ही कामी पडले यांचे मुख्य कारण अप्रचार आहे. तो आम्ही थांबविण्यात कमी पडलो या व्यतिरिक्त आणखी काही कारणे असतील त्याचा  पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत घेऊ असे ही तेली यांनी सांगितले.सावंतवाडी मतदारसंघात रोजगार हा विषय मोठा आहे.आडाळी एमआयडीसीत अत्तर तयार करणारी कंपनी आली असून त्यांनी आपला प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून ही कंपनी सुरू झाल्यास रोजगाराचा प्रश्न सुटेल अशी आशा ही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालRajan Teliराजन तेली Nitesh Raneनीतेश राणे Deepak Kesarkarदीपक केसरकर