शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा भाजपकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 17:59 IST

CoronaVirus Sindhudurg Goa : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिंधुदुर्गला काही ऑक्सिजन सिलेंडर दिले. त्यामुळे काँग्रेसचे नेते गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे कणकवली तालुका भाजपच्यावतीने कामत यांचा सोमवारी निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देगोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा भाजपकडून निषेध कणकवली कार्यालयासमोर निदर्शने

कणकवली : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिंधुदुर्गला काही ऑक्सिजन सिलेंडर दिले. त्यामुळे काँग्रेसचे नेते गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे कणकवली तालुका भाजपच्यावतीने कामत यांचा सोमवारी निषेध करण्यात आला.यावेळी भाजपा कणकवली शहर मंडल अध्यक्ष मिलींद मेस्त्री, भाजपा जिल्हा कार्यालय प्रमुख समर्थ राणे, कळसुली बूथ अध्यक्ष सचिन पारधिये,नागवे बूथ अध्यक्ष सचिन खेडेकर, कणकवली बूथ अध्यक्ष प्रवीण पाटील, संजय ठाकूर उपस्थित होते.या निषेधाच्यावेळी मिलिंद मेस्त्री म्हणाले, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे एकमेकांची शत्रू असलेली राष्ट्रेही एकमेकांना मदतीचा हात देत आहेत . तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या शेजारील राज्याचा माजी मुख्यमंत्री सिंधुदुर्गाला ऑक्सिजन सिलेंडर दिले म्हणून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप तसेच टीका करीत आहेत. आजपर्यंत गोवा आणि सिंधुदुर्ग यांचे संबंध स्नेहाचे राहिलेले आहेत.किंबहुना सिंधुदुर्ग हा गोव्याचाच भाग असल्यासारखे वातावरण आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता असल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ऑक्सिजन सिलिंडर मिळण्यासाठी विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊन डॉ. प्रमोद सावंत यांनी शेजारधर्माच्या नात्याने,तातडीची गरज म्हणून काही सिलिंडर पाठवण्याची व्यवस्था केली. या गोष्टीचे गोवा काँग्रेसकडून राजकारण केले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांना या विषयावरून लक्ष्य करणारे दिगंबर कामत यांचा भारतीय जनता पार्टी कणकवली तालुक्याच्यावतीने आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. असेही ते म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाgoaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत