शिवसेनेच माजी जिल्हाप्रमुख अनिल परुळेकर यांचे निधन; सिंधुदुर्ग जिल्ह्यात शोककळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2023 07:00 IST2023-03-03T06:59:40+5:302023-03-03T07:00:04+5:30

मुंबईत शिवसेनेच्या स्थापनेपासून ते कार्यरत होते. कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना रूजविण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

Former District Chief of Shiv Sena Anil Parulekar passed away in Sawantwadi | शिवसेनेच माजी जिल्हाप्रमुख अनिल परुळेकर यांचे निधन; सिंधुदुर्ग जिल्ह्यात शोककळा 

शिवसेनेच माजी जिल्हाप्रमुख अनिल परुळेकर यांचे निधन; सिंधुदुर्ग जिल्ह्यात शोककळा 

सावंतवाडी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय कडवट शिवसैनिक व सिंधुदुर्गचे माजी जिल्हाप्रमुख अनिल हरी परुळेकर ( रा. सावंतवाडी ) यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी त्याचे अल्पशा आजाराने निधन झाले असून अनेक शिवसैनिकावर शोककळा पसरली आहे.

मुंबईत शिवसेनेच्या स्थापनेपासून ते कार्यरत होते. कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना रूजविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सावंतवाडीत आल्यानंतर त्याच्या घरी वास्तव्यास असायचे ठाकरेंची सावंतवाडीत पहिली सभा ही त्यांनीच आयोजित केली होती.शिवसेना जिल्हाप्रमुख असतना संपूर्ण जिल्हा ते रिक्षाने पिजून काढत असत.

त्याचे राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध राहिले होते. कडवट निष्ठावंत शिवसैनिक तसेच साहित्यिक म्हणून त्यांची वेगळी ओळख होती.
समाजकारणाचा ध्यास घेत कडवट अन् करारी बाणा शेवटच्या श्वासापर्यंत कायम होता. माजी नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांचे ते काका होते.

Web Title: Former District Chief of Shiv Sena Anil Parulekar passed away in Sawantwadi