शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पिण्याच्या पाण्यासाठी फोंडावासीयांनी केला निर्धार,ग्रामस्थांची नियोजन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 11:37 IST

लोरे तलावातील पाण्याच्या साठवणीची दैनावस्था याबाबतची खरी वस्तुस्थिती लोकमतमधून प्रसिद्ध होताच याची फोंडा येथील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामस्थ यांनी त्वरित दखल घेतली. एक दिवस गावासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी या घोषणेसह सर्व ग्रामस्थांनी तलावातील गाळ उपसा करण्याचा निर्धार केला.

ठळक मुद्दे पिण्याच्या पाण्यासाठी फोंडावासीयांनी केला निर्धार,ग्रामस्थांची नियोजन बैठकलोकमतच्या वृत्ताने घेतली दखल; तलावातील गाळ उपसा करण्याचा निर्णय

फोंडाघाट : लोरे तलावातील पाण्याच्या साठवणीची दैनावस्था याबाबतची खरी वस्तुस्थिती लोकमतमधून प्रसिद्ध होताच याची फोंडा येथील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामस्थ यांनी त्वरित दखल घेतली. एक दिवस गावासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी या घोषणेसह सर्व ग्रामस्थांनी तलावातील गाळ उपसा करण्याचा निर्धार केला.यासाठी नियोजनाची बैठक श्री देव राधाकृष्ण मंदिरात मोठ्या उपस्थितीत पार पडली. बुधवार ५ जून रोजी सर्व ग्रामस्थ व बंधूभगिनींच्या उपस्थितीत संपूर्ण दिवसभर गाळ उपशाचा शुभारंभ करण्यात येईल, असे ठरविण्यात आले.यावेळी कणकवली तालुका सभापती सुजाता हळदिवे, जिल्हा परिषद सदस्य संजय आंग्रे, सरपंच संतोष आंग्रे, हेल्थ अ‍ॅकॅडमीचे महेश सावत, राजू पटेल, संदेश पटेल, कुमार नाडकर्णी, भालचंद्र राणे, सुंदर पारकर, संजय नेरूरकर, सचिन नाकाडी, सचिन भोगले, विशाल रेवडेकर, बाळा पारकर, पप्या सावंत, समीर मांगले, प्रथमेश रेवडेकर, अजित नाडकर्णी, एकनाथ कातरूड, विश्वनाथ जाधव, हर्षल तेंडुलकर, भाई गुरव, संतोष पारकर, संजय पटेल, मोहन पारकर, राजेश शिरोडकर, अवी चाचुर्डे, सुभाष मर्ये, महेश पेडणेकर उपस्थित होते.यावेळी उपस्थित ठेकेदारांनी आपले जेसीबी, सुमारे दहा डंपर-ट्रॅक्टर तसेच उपस्थितांसाठी नाश्ता, जेवणाची सोय, सरपंच, गावातील टपरीवाले, हॉटेलवाले यांनी स्वखर्चाने उत्स्फूर्तपणे देण्याचे कबूल करून मानवतेसाठी एक पाऊल पुढे टाकले. आरोग्य विभागाने प्रथमोपचार टीम उपस्थित ठेवण्याचे मान्य केले.यावेळी सर्वांनीच हे काम एक दिवसांत पूर्ण होणार नाही याची कल्पना आहे. मात्र, त्या निमित्ताने जनजागृतीतून गाव एकत्र येईल आणि एका रात्रीत काही वर्षांपूर्वी वाघोबाच्या मंदिर बांधणीची पुनरावृत्ती होईल. चांगले कार्य घडेल असा विश्वास व्यक्त केला. मात्र पुढील वर्षी नाम फाऊंडेशन अथवा केंद्राची गाळमुक्त तलाव-शिवार योजनेच्या प्रस्तावाद्वारे संपूर्ण तलाव गाळमुक्त करण्याचे अभिवचन जिल्हा परिषद सदस्य संजय आंग्रे यांनी ग्रामस्थांना दिले.घोणसरी-देवघर धरणाच्या डाव्या कालव्याचे काम ३, ४ ग्रामस्थांनी त्यांच्या योग्य तक्रारीसाठी दावा दाखल करून अडविल्याने सोडलेले पाणी मध्यंतरी अडविले जाते. तो पेच प्रशासनाने सोडविल्यास धरणाचे पाणी थेट गांगोवाडीपर्यंत आणि उगवाई नदीमधून, कोंडयेपर्यंत पोहोचू शकेल.

पर्यायाने कधी पाणी टंचाई उद्भवणार नाही. त्यासाठी तक्रारदारांना ग्रामस्थांचे शिष्टमंडळ भेटले. तुमच्या दाव्यासाठी गाव तुमच्याबरोबर आहे. मात्र, काम अडवून गावाला वेठीस धरू नका अशी विनंती समस्त ग्रामस्थांनी केली. शेवटी ग्राम सहभागातून होणारे हे गाळ उपशाचे काम संपूर्ण जिल्ह्याला मार्गदर्शन ठरेल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. सर्वांच्या सहभागातून काम करण्याचा निर्धार केला.एक दिवस गावासाठी ग्रामस्थांनी दिली हाकतलावातील अपुरा पाणीसाठा, गावच्या नळयोजनेपुढील संकट लक्षात घेता संपूर्ण गावातील अबालवृद्ध, बचतगटांतील महिला भगिनी, शेतकरी, कामगार, कर्मचारी यांनी एकमुखाने बुधवार ५ जून लोरे येथील तलाव परिसरात उपस्थित राहण्याचे ठरविले आहे. या दिवशी एक दिवस गावासाठी देताना ह्यसाथी हाथ बढाना... या प्रकारे तलावातील गाळ उपसा करण्याची ग्वाही दिली. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईsindhudurgसिंधुदुर्ग