फोंडाघाटचे आणि एक छत्र हरवले ! जेष्ठ समाजवादी चंद्रकांत तथा बापू नेरुरकर यांचे निधन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 07:21 PM2020-11-11T19:21:14+5:302020-11-11T19:23:10+5:30

kankavli, death, sindhdudurg कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील जेष्ठ समाजवादी, कुशल राजकारणी, विचारवंत,समाजसेवक चंद्रकांत शांताराम तथा बापू नेरूरकर (वय८४ ) यांचे वृध्दापकाळातील आजाराने निधन झाले. ​​​​​​​

Fondaghat and lost an umbrella! | फोंडाघाटचे आणि एक छत्र हरवले ! जेष्ठ समाजवादी चंद्रकांत तथा बापू नेरुरकर यांचे निधन !

फोंडाघाटचे आणि एक छत्र हरवले ! जेष्ठ समाजवादी चंद्रकांत तथा बापू नेरुरकर यांचे निधन !

Next
ठळक मुद्देफोंडाघाटचे आणि एक छत्र हरवले ! जेष्ठ समाजवादी चंद्रकांत तथा बापू नेरुरकर यांचे निधन !

कणकवली : कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील जेष्ठ समाजवादी, कुशल राजकारणी, विचारवंत,समाजसेवक चंद्रकांत शांताराम तथा बापू नेरूरकर (वय८४ ) यांचे वृध्दापकाळातील आजाराने निधन झाले.

गेली अनेक दशके अन् रत्नागिरी जिल्हा विभाजनापूर्वीपासुन राजकारण व समाजकारणात त्यांनी आपले सौदार्हपूर्ण व्यक्तीमत्व जपले होते. समाजवादी , नंतर जनता दल सरचिटणीसच्या माध्यमातून बॅ. नाथ पै, मधू दंडवते पासून पुष्पसेन सावंत यांच्यापर्यंत अनेकांशी त्यांची जवळीक होती. अखंड रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हापरिषद सदस्य म्हणून त्याचे काम मार्गदर्शक होते.

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापनेत, बॅ. नाथ पै वाचनालयाची निर्मीती आणि फोंडाघाट गावच्या उत्थापनात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. त्यांच्या पश्चात पत्नी तसेच वीज मंडळातील प्रदिप नेरूरकर ,शिक्षणप्रेमी रंजन नेरुरकर व सर्पमित्र संजय नेरुरकर यासह भाऊ,बहिणी, सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

नाना नेरुरकर यांचे ते बंधू होत. त्यांच्या अंत्ययात्रेत सर्व स्तरातील नागरिक सहभागी झाले होते. बापूंच्या जाण्याने फोंड्याचा सच्चा मार्गदर्शक हरवल्याचे दुःख परिसरात व्यक्त होत आहे .
 

 

 

 

Web Title: Fondaghat and lost an umbrella!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.