शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

फोंडाघाट चोरीतील आरोपीला कर्जतमधून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 17:11 IST

फोंडाघाट खैराटवाडी येथील स्वत:च्याच घरात २ लाख ४० हजारांची चोरी करून पसार असलेला संशयित आरोपी लक्ष्मण पांडुरंग खरात याला गुन्हा अन्वेषण शाखेने कर्जत-नेरळ येथून ताब्यात घेतले आहे. त्याने स्वत:च्या घरात तिसऱ्या वेळी चोरी केल्याने वडील पांडुरंग खरात यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

ठळक मुद्देफोंडाघाट चोरीतील आरोपीला कर्जतमधून अटकतीन दिवसांची पोलीस कोठडी

कणकवली : फोंडाघाट खैराटवाडी येथील स्वत:च्याच घरात २ लाख ४० हजारांची चोरी करून पसार असलेला संशयित आरोपी लक्ष्मण पांडुरंग खरात याला गुन्हा अन्वेषण शाखेने कर्जत-नेरळ येथून ताब्यात घेतले आहे. त्याने स्वत:च्या घरात तिसऱ्या वेळी चोरी केल्याने वडील पांडुरंग खरात यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

या तक्रारीनुसार अटकेची कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने केली. त्याला कणकवली पोलिसांनी बुधवारी न्यायालयात हजर केले असता २६ जुलैपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.फोंडाघाट-खैराटवाडी येथील आपल्या घरात बनावट चावी वापरून सोने व रोख रक्कम असा २ लाख ४० हजारांचा ऐवज लक्ष्मण खरात याने चोरला होता. चोरी केल्यानंतर त्याने पोबारा केला होता. कणकवली पोलीस ठाण्यात या चोरट्याविरोधात गुन्हा दाखल होता. सिंधुदुर्ग जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखेकडून आरोपीच्या मागावर पथक रवाना करण्यात आले होते. त्या पथकाने लक्ष्मण याला २३ जुलै रोजी कर्जत येथे पकडले. त्याच्याकडून रोख ९५०० रुपये व तसेच त्याने लपवून ठेवलेले १ लाख १७ हजारांचे दागिने घरात आढळून आले. हा मुद्देमाल कणकवली पोलिसांनी जप्त केला आहे.उर्वरित रक्कम आरोपीने खर्च केल्याची प्राथमिक माहिती आहे. लक्ष्मण खरातला न्यायालयात हजर केले असता २६ जुलैपर्यंत ३ दिवसांची कोठडी मिळाली आहे. याबाबतचा अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत. ही अटकेची कारवाई गुन्हा अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहू देसाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खंदारे, पोलीस कॉन्स्टेबल गुरु कोयंडे, कांदळगावकर आदी पोलिसांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग