शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‎Sindhudurg: संततधारेने कुडाळच्या भंगसाळ नदीला पूर, नागरिकांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 16:03 IST

अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली

कुडाळ : कुडाळ तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भंगसाळ नदीला पूर आला असून, कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर तसेच इतर काही भागांमध्ये बुधवारी रात्री पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे येथील ५० ते ६० ग्रामस्थांना रात्रीच दुसरीकडे स्थलांतरीत व्हावे लागले. काही घरांमध्ये पाणी घुसले असून, असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास पुराचे पाणी अनेक घरात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.‎मागील दोन दिवस पावसाने पुन्हा एकदा कुडाळ तालुक्यात मुसळधार बरसण्यास सुरुवात केली आहे. सतत पडणाऱ्या या पावसामुळे बुधवारी रात्री भंगसाळ नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. यामुळे कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील काही घरांमध्ये पुराचे पाणी घुसले. काही घरांच्या पायरीपर्यंत पाणी आले होते. पाऊस मोठ्या प्रमाणात बरसत राहिल्यास ही पूरस्थिती अधिक तीव्र होऊ शकते.

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ‎तसेच तालुक्यातील कर्ली, निर्मला, बेल या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून, पूरस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता बंद‎भंगसाळ नदीला आलेल्या पुरामुळे कुडाळ शहरातील गुलमोहर हॉटेलसमोरील शहरात येणारा मुख्य रस्ता तसेच रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता यावरही पाणी आले होते. त्यामुळे येथील वाहतूक काही काळ बंद होती. बराच वेळ पाणी ओसरत नसल्याने वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली होती.

नागरिकांचे स्थलांतर

५० ते ६० नागरिकांना बुधवारी रात्री स्थलांतरीत करावे लागले. कारण बुधवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. बुधवारी रात्री पावसाने जोर पकडल्याने भंगसाळ नदीला पूरस्थिती प्राप्त झाली होती. परिणामी कुडाळ आंबेडकरनगरमधील वस्तीला फटका बसण्याची शक्यता असल्याने काही नागरिकांचे रात्रीच स्थलांतर करण्यात आले.

नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारादरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला होता. बुधवारी रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू होती. गुरुवारी दुपारपर्यंत पाऊस कोसळत होता. परिणामी बहुतांश नद्यांना पूरस्थिती होती. त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.