तळेरे : मुसळधार पावसाने रविवारी सायंकाळी अक्षरश: सर्वांची दाणादाण उडविली. कासार्डे देऊलकरवाडी आणि तांबळवाडीला जोडणाऱ्या पुलावरून ओढ्याचे पाणी जात होते. तर देऊलकरवाडी येथील महापुरुष मंदिरात पाणी भरले. अनेक ठिकाणी सुरू असलेली भात कापणी दुपारीच थांबविली गेली.रविवारी दुपारपासूनच ढगांचा गडगडाट सुरू होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेतली होती. मात्र, या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी भरले. त्यामुळे काहीवेळ सर्व ठप्प होते. तर विजेचा लपंडाव सातत्याने सुरू होता.अचानक आलेल्या पावसाने अनेकांची भंबेरी उडाली. देऊलकरवाडी व तांबळवाडीत पाणी भरले. अनेक ओढ्यातील पाण्याची पातळी अचानक वाढली होती.शेतकऱ्यांचे नुकसानपावसाने दोन तासानंतर थोडी उसंत घेतली. मात्र, रिपरिप सुरूच होती. त्यातही विजेचा लपंडाव सुरूच होता. त्यामुळेही सेवा विस्कळीत झाली होती. पावसाच्या हलक्या सरी कायम सुरूच असल्याने अनेक ठिकाणी पाणी भरले होते. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरुच होता. काही ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले.
महापुरुष मंदिराला पुराचा वेढा, कासार्डेत पावसाचे धुमशान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 14:46 IST
rain, temple, sindhdurugnews मुसळधार पावसाने रविवारी सायंकाळी अक्षरश: सर्वांची दाणादाण उडविली. कासार्डे देऊलकरवाडी आणि तांबळवाडीला जोडणाऱ्या पुलावरून ओढ्याचे पाणी जात होते. तर देऊलकरवाडी येथील महापुरुष मंदिरात पाणी भरले. अनेक ठिकाणी सुरू असलेली भात कापणी दुपारीच थांबविली गेली.
महापुरुष मंदिराला पुराचा वेढा, कासार्डेत पावसाचे धुमशान
ठळक मुद्देमहापुरुष मंदिराला पुराचा वेढा, कासार्डेत पावसाचे धुमशानतांबळवाडीला जोडणाऱ्या पुलावर पाणी, कापलेले भात गेले वाहून