शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

सिंधुदुर्गात आरोग्य सेवेत त्रुटी; स्थानिक आमदारांनी मतदारसंघातील समस्यांकडे लक्ष द्यावे - परशुराम उपरकर

By सुधीर राणे | Updated: October 4, 2023 13:28 IST

नांदेड व छत्रपती संभाजीनगर मध्ये आरोग्य सेवेतील त्रुटींमुळे जी दुर्घटना झाली तशीच अवस्था सिंधुदुर्गात होण्याची वेळ 

कणकवली: नांदेड व छत्रपती संभाजीनगर मध्ये आरोग्य सेवेतील त्रुटींमुळे जी दुर्घटना झाली तशीच अवस्था सिंधुदुर्गात होण्याची वेळ आली आहे. असा आरोप करतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच इतर लोकप्रतिनिधी 'आपला दवाखाना' सुरू करण्याबाबत घोषणा करतात. त्याचे उदघाटन करतात. पण तिथे आवश्यक औषध पुरवठा होतो का ?  जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४१ डॉक्टरची पदे रिक्त आहेत. वर्ग ३ आणि वर्ग ४ ची पदे भरलेली नाहीत,अशी स्थिती आहे. त्यामुळे स्थानिक आमदार वैभव नाईक, आणि नितेश राणे यांनी राज्यातील विषयांवर बोलण्यापेक्षा आपल्या मतदारसंघातील समस्यांकडे आधी लक्ष द्यावे. असा टोला मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.परशुराम उपरकर म्हणाले, १० अधिपरीचारिकांची पदे मंजूर असतानाही केवळ ३ अधिपरीचारिका देवगड ग्रामीण रुग्णालयात रुग्णसेवा देत आहेत. कामाच्या अति ताणामुळे त्या अधिपरीचारिका संपावर जाणार आहेत. ही लज्जास्पद बाब आहे.जिल्ह्याचे एक सुपुत्र केंद्रीयमंत्री तर दोघे राज्यात  मंत्री असूनही जिल्ह्याची आरोग्यसेवा सुधारू शकत नाहीत. तर आता विरोधी पक्षात असलेले खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी सत्तेत असताना  १६०० कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या घोषणेचे काय झाले ? शासकीय वैद्यकीय महाविद्यालय  घाईगडबडीत सुरू करून  एमबीबीएस शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले जात आहे. त्यांना आवश्यक असलेल्या शैक्षणिक तसेच इतर सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आहे. सिंधुदुर्गातील शासकीय आरोग्य सेवेची स्थिती पाहता जनता आता लोकप्रतिनिधींच्या फसव्या आश्वासनाला बळी पडणार नाही. येत्या निवडणुकीत त्यांना निश्चितच धडा शिकवेल. मात्र, शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे श्रेय घेण्यात लोकप्रतिनिधी  गुंतलेले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गातील आरोग्य सेवेबाबत वेळीच दखल न घेतल्यास नांदेड सारखी घटना घडायला वेळ लागणार नाही. त्यामुळे जनतेने जागरूक रहावे,असे आवाहनही परशुराम उपरकर यांनी यावेळी केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलParshuram Upkarपरशुराम उपरकर Nitesh Raneनीतेश राणे Vaibhav Naikवैभव नाईक