शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कनेडी राड्यातील भाजप, शिवसेनेच्या पाच कार्यकर्त्यांना पुन्हा अटक; आज न्यायालयात हजर करणार

By सुधीर राणे | Updated: February 14, 2023 13:51 IST

कनेडी येथील राड्याप्रकरणी भाजप व शिवसेनेच्या ५० पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल आहे

कणकवली : कनेडी येथे शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राडाप्रकरणी सध्या भा. दं. वि. कलम ३०७ च्या गुन्हयांतर्गत न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयितांपैकी चौघांना कणकवली पोलिसांनी कलम ३५३ च्या गुन्ह्यांतर्गत सोमवारी अटक केली. यावेळी ३५३ च्या गुन्ह्यांतर्गत न्यायालयीन कोठडीत असलेल्या एकाला ३०७ च्या गुन्हयामध्ये अटक करण्यात आली. पाचही संशयितांना आज (मंगळवारी) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कलम ३५३ व अन्य कलमांतर्गत अटक केलेल्यांमध्ये भाजपचे श्रीकांत उर्फ कांता नारायण सावंत (५०, भिरवंडे-बिवणेवाडी), राजेश मधुकर पवार (५१, दिगवळे- करंबळीवाडी), निखिल प्रकाश आचरेकर (३९, कणकवली- मारुतीआळी), शिवसेनेचे मंगेश रामचंद्र सावंत (४८, भिरवंडे- पुनाळवाडी) यांचा समावेश आहे. तर भा.दं.वि. कलम ३०७ व अन्य कलमांतर्गत संदीप बाळकृष्ण गावकर (३२, सांगवे-गावकरवाडी) याला अटक करण्यात आली आहे.दरम्यान, कनेडी येथील राड्याप्रकरणी पोलिसांनी चार गुन्हे दाखल केले आहेत. त्यानुसार भाजप व शिवसेनेच्या  ५० पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल आहे. त्यातील दहा जणांना अटक झाली असून इतरांना कधी अटक होणार? याची उत्सुकता नागरिकांना आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी