शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार हेक्टरवरील भात, नाचणीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 11:04 IST

क्यार वादळामुळे देवगड तालुक्यात सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्रावरील भात व नाचणी शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र, शासनाने आदेश देऊनही कृषी व महसूल विभागामार्फत संथगतीने पंचनामा प्रक्रिया सुरू असल्याबाबतची नाराजी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपाच हजार हेक्टरवरील भात, नाचणीचे नुकसान५ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली

देवगड : क्यार वादळामुळे देवगड तालुक्यात सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्रावरील भात व नाचणी शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र, शासनाने आदेश देऊनही कृषी व महसूल विभागामार्फत संथगतीने पंचनामा प्रक्रिया सुरू असल्याबाबतची नाराजी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.देवगड तालुक्यामध्ये शेतकरी उदरनिवार्हासाठी भात व नाचणी शेती करतात. क्यार वादळामुळे भातशेती कापणीच्यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने भातशेती व नाचणी शेतीचे नुकसान झाले. ऐन कापणीच्यावेळीच पावसाने थैमान घातल्याने हातातोंडाशी आलेल्या पिक पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले.

शासनस्तरवरून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला दिले. मात्र दिवाळीच्या सुटीत बहुतांश कर्मचारी हे रजेवर गेल्याने देवगड तालुक्यातील पंचनाम्याची प्रक्रिया रखडली होती.

मात्र दिवाळी संपल्यानंतर कर्मचारी हजर झाले तरीही ज्या गतीने पंचनामे करणे गरजेचे होते तशा पध्दतीने ते होत नसून संथगतीने ही प्रक्रिया सुरू असल्याने शेतकरीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.आतापर्यंत तालुक्यामध्ये सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्रातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे केले गेले आहेत. अद्याप सुमारे ४ हजार हेक्टर क्षेत्रातील भातशेती नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नुकतेच देवगड तालुक्यामध्ये भातशेती व मच्छिमारांच्या नुकसानीची पाहणी करून आढावा घेण्यासाठी शिक्षणमंत्री आशिष शेलार व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दौरा केला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी व मच्छिमारांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी व मच्छिमारांनी आपल्या समस्या मांडून नुकसानीची माहिती दिली.तत्काळ पंचनामे करामच्छिमार व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानी देण्याचे आश्वासन दोन्ही मंत्र्यांनी दिले. मात्र किती क्षेत्राचे नुकसान झाले, पंचनामा प्रक्रिया कशा पद्धतीने झाली याची माहिती मात्र त्यांनी घेतली नाही. नुकसानग्रस्त क्षेत्राचे तत्काळ पंचनामे होणे गरजेचे आहेत. मात्र संथगतीने सुरू असलेल्या पंचनाम्याबाबत संबंधित विभागांना सूचना देऊन तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस