आंबोली येथील अपघातात पाचजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 16:43 IST2017-09-21T16:43:05+5:302017-09-21T16:43:09+5:30
आंबोली कामतवाडी येथे इरटिगा (MH 02 3389 )गाडीला अपघात होउन एकाच कुटूंबातील पाचजण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास झाला.

आंबोली येथील अपघातात पाचजण जखमी
आंबोली 21 : आंबोली कामतवाडी येथे इरटिगा (MH 02 3389 )गाडीला अपघात होउन एकाच कुटूंबातील पाचजण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास झाला.
मालवण-विरण मसदे येथील पवार कुटुंबिय तिरूपती बालाजीचे दर्शन करून घरी मालवण येथे माघारी परतत होते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आंबोली कामतवाडी येथे गाडी उलटून हा अपघात झाला.
यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात एकाच कुटूंबातील दोन महिला, दोन तरुणी आणि चालक जखमी झाले आहेत, त्यांना आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.