अपघातात पाचजण जखमी
By Admin | Updated: July 16, 2014 00:24 IST2014-07-16T00:22:20+5:302014-07-16T00:24:46+5:30
ओसरगाव येथे झायलो झाडावर आदळली

अपघातात पाचजण जखमी
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरून ठाणे ते कुडाळ असा प्रवास करीत असताना ओसरगाव येथे चालकाचा झायलो कारवरील ताबा सुटून अपघात झाला. चालकासह पाचजण जखमी झाले आहेत. जखमींवर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत असून ही घटना सोमवारी दुपारी ३.३० वाजता घडली.
ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील विनायक अनंत मुंडले (वय ५२) आपल्या ताब्यातील झायलो कार (क्र. एम.एच.०४, डी. ८२७९ घेऊन ठाणे ते कुडाळ असा प्रवास करीत होते. महामार्गावरील ओसरगावच्या दरम्यान त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूच्या वडाच्या झाडावर गाडी जावून जोरदार आदळली. त्यामुळे झालेल्या अपघातात विनायक मुंडले, अनंत नारायण जडये (वय ६२), प्रणव विनायक मुंडले (वय २२), विद्या विनायक मुंडले (वय ४८), स्नेहा विनायक मुंडले हे जखमी झाले आहेत. जखमींना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (वार्ताहर