शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत परप्रांतीय नौकांवर मत्स्य विभागाकडून कार्यवाही सुरु, मंत्री नितेश राणे यांनी दिले होते निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 18:38 IST

पावसामुळे समुद्र अद्याप शांत झालेला नाही तसेच वारा जास्त असल्याने गस्त घालण्यास अडचणी

मालवण: सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीवर घुसखोरी करून मासळीची लूट करणाऱ्या परराज्यातील नौकावर गतवर्षी मत्स्योद्योग तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार कठोर कारवाई करण्यात आली. आता नव्या मासेमारी हंगामाच्या सुरवातीलाच अनधिकृत नौकांवर कठोर कारवाई बाबत निर्देश काही दिवसांपूर्वीच प्रशासनास दिले आहेत. त्यानुसार सागरी कायद्याअंतर्गत कठोर कारवाईसाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून सज्जता ठेवण्यात आली असून कार्यवाही सुरु असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भौगोलिक स्थान पाहता जिल्ह्याच्या सिमेस लागून गोवा व कर्नाटक राज्य येतात, सदर राज्यातील मासेमारी नौकांकडून जिल्ह्याच्या सागरी हद्दीत मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते असते. त्याअनुषंगाने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन, १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य कार्यालया मार्फत गस्ती नौका भाडेपट्टीवर जिल्हास्तरावर घेण्याबाबत आदेशित केले होते.त्यानुसार नौका "शितल" नौका नोंदणी क्रमांक IND-MH-५-MM-३३०६ ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सागरी गस्तीकरीता दि.११/०८/२०२३ रोजी पासुन महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन, १९८१ या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. सागरी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व अंमलबजावणी अधिकारी यांचे मार्फत नियमित गस्त सुरु करण्यात आली आहे.पावसाळी व वादळी हवामान असल्याने प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचे मार्फत समुद्रात न जाणे बाबत सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. पावसामुळे समुद्र अद्याप शांत झालेला नाही तसेच वारा जास्त असल्याने गस्त घालण्यास अडचणी निर्माण होत आहेत. सद्यस्थितीत हवामान विभागाने ०५ सप्टेंबर पर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वारा व पाऊस कमी असताना गस्त घालण्याची अंमलबजावणीची कार्यवाही सुरु आहे. ड्रोन व गस्ती नौकेच्या सहाय्याने अनधिकृत नौकांवर सागरी कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.