महेश सरनाईक
खारेपाटण (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे कार्यकर्त्यांचा अपूर्व उत्साहात मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे आता काही वेळातच भव्य स्वागत केले जाणार आहे. या स्वागतासाठी जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण क्रेन साह्याने पुष्पहार घातले जाणार आहेत. जिल्ह्याच्या सीमेवर खारेपाटण येथे ५० जेसीबी आणि क्रेन फुलांनी भरून सज्ज करण्यात आले आहेत. ढोल ताशांचा गजर फटाक्यांच्या आतषबाजी आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी महामार्ग संपूर्ण दणाणून गेला आहे.
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितेश राणे पहिल्यांदाच सिंधुदुर्गात येत आहेत. त्यातच कालच रात्री उशिरा फडणवीस सरकारचे खातेवाटप जाहीर झाले असून त्यात राणे यांना मत्स्योद्योग आणि बंदर विकास मंत्रालयाची जवाबदारी देण्यात आली आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील मत्स्य व्यवसायाला यामुळे चालना मिळाली आहे.