तुरीच्या झाडाचा पहिला वाढदिवस
By Admin | Updated: January 14, 2015 23:50 IST2015-01-14T22:15:36+5:302015-01-14T23:50:44+5:30
विक्रमी उंचीचे झाड : वेंगुर्ले-मठ येथे उपक्रम

तुरीच्या झाडाचा पहिला वाढदिवस
वेंगुर्ले : वेंगुर्ले- मठ येथील शेतकरी भाऊ बोवलेकर यांनी नवीन लागवड केलेल्या तुरीच्या झाडाचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. बोवलेकर यांनी तूरडाळीचा नवीन उपक्रम करून हे झाड तब्बल २४ फूट उंच वाढविले आहे. याचा पहिला वाढदिवस जिल्हा कृषी अधीक्षक तथा ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक एन. जी. वाकडे यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी मठ सरपंच स्रेहलता ठाकूर, उपसरपंच नित्यानंद शेणई, तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद मोबारकर, उद्योजक सुरेश बोवलेकर, सुरेश धुरी, सामाजिक कार्यकर्ते दयानंद शेणई, ग्रामपंचायत सदस्य अमृता खानोलकर, महेश बोवलेकर, मेहंदी बोवलेकर, नामदेव मठकर, दादा आरोलकर, वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राचे कीटकशास्त्र ए. वा. मुंज, दत्ताराम बोवलेकर, तरुण उद्योजक दीपक ठाकूर, निवृत्त शिक्षक आबा मठकर, पोलीसपाटील लाडू मठकर, माजी सरपंच शुभांगी सावंत, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)