सिंधुदुर्गात स्वाइन फ्लूचा पहिला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 05:17 IST2018-10-22T05:17:52+5:302018-10-22T05:17:54+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा पहिला बळी गेला आहे.

सिंधुदुर्गात स्वाइन फ्लूचा पहिला बळी
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा पहिला बळी गेला आहे. स्वाइन फ्लू झालेल्या पोलीस नाईक विजय जयराम लोकरे यांचे कोल्हापूर येथील रुग्णालयात रविवारी सायंकाळी उपचारादरम्यान निधन झाले.
विजय लोकरे यांना ५ आॅक्टोबरपासून ताप येत होता. खासगी दवाखान्यात प्रथम त्यांनी उपचार घेतले. १० आॅक्टोबरला त्यांना चक्कर आल्याने तसेच श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या वेळी त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले होते. ताप कमी न झाल्याने त्यांना ११ आॅक्टोबरला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तिथे १४ आॅक्टोबरला पुन्हा चाचणी केल्यावर स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.